By : Polticalface Team ,02-05-2024
जनआधार न्युज
प्रतिनिधी भिमसेन जाधव
9112131616
माता भगिणींकडून औक्षण करण्यात आले. ग्रामदैवत रोकडोबा महाराज आणि मारोती मंदिर तसेच भागिरथी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका प्रचार दौरा निमित्त आयोजित कार्यक्रम सप्तपदी लॉन्स देहू रोड एलवाडी येथे पार पडला. यावेळी माळुंगे खालुंबरे एलवाडी सांगुर्डी कानेवाडी येथील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संत तुकाराम महाराजांची पगडी आणि भक्ती शक्ती मूर्ती देऊन आदर्श सत्कार करण्यात आले.
दादा -
- दीड हजार कोटींचा निधी या मतदार संघामध्ये मागिल 5 वर्षामध्ये पोहोचवण्याचा काम केला आहे.
- दुर्दैवाने विद्यमान खासदारांकडून एकही रुपयाचा निधी मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघात आला नाही.
- तळेगाव, चाकण, शिक्रापूर ट्राफिक पाच वर्षात इकडच कागद तिकडे हलला नाही.
- पण मत मागायला तयार झाले पंधरा वर्षे मी सतत जनतेत राहिलो आहे.जनता दरबार भरवला आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे.
-
दिलीप अण्णा मोहिते पाटील
- महाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगुंर्डी व कान्हेवाडी या गावांमध्ये 32 कोटी 56 लाख रुपये निधी देण्यात आले.
- सामान्य जनतेचे प्रश्न काय रस्ते, लाईट व पाणी पाहिजे विद्यमान खासदार या विषयावर बोलतच नाही. महागाईचा विषय काढतात. महागाई काय एका विषयाने होते का?
- अनुभवी, काम करणारा तुमच्या आमच्या हाकेला धावून येणारा प्रतिनिधी शिवाजी दादा आढळराव पाटील यांना निवडून आणायचे आहे.
या प्रसंगी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश थिगळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैलास सांडभोर, अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस जयसिंग दरेकर, माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले, अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम शेठ भोसले, संचालक बाजारसमिती रंजितशेठ गाडे, चेअरमन विविसोसायटी येलवाडी संतोष बोत्रे, पीएमआरडीए सदस्य वसंतराव भसे, युवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा निलेशराव चिगळे, संत भागीरथी माता अध्यक्ष बाळासाहेब गाडे, संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना मारोती शेठ भसे, माजी सरपंच अशोकराव बोत्रे, उपसरपंच प्रशांत गाडे, सरपंच सोनमताई बोत्रे, माजी सरपंच तुकाराम काळे उपसरपंच मनोजदादा खांडेभराड तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :