संजय निर्मळ सेवानिवृत्त

By : Polticalface Team ,05-05-2024

संजय निर्मळ सेवानिवृत्त

लिंपणगाव  (प्रतिनिधी):दीड.०५ सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत नोकरी करणे आणि यशस्वीपणे सेवानिवृत्त होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून सेवापुर्ती निमित्त सर्व सहकारी,हितचिंतक व नातेवाईक उपस्थित राहणे हे काम करणाऱ्या माणसांचे मनोधैर्य वाढवणारे आहे, असे मत प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी यांनी व्यक्त केले.

     शासकीय दूध योजना अहमदनगर येथील अभियंता संजय निर्मळ  यांच्या सेवापूर्ती समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय दूध योजना नगरचे माजी महाव्यवस्थापक सुहास सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष मनोहर पोकळे, केशरबाई निर्मळ, वृषाली निर्मळ, ऍड मुकुल गंधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

          डॉ. जोशी पुढे म्हणाले बोलताना म्हणाले की,सर्वसामान्य माणसांसाठी सातत्याने धावून येणारे संजय निर्मळ सेवानिवृत्त होत असताना सामाजिक ध्येय पुढे ठेवून काम करतील.

   शासकीय दूध योजनेमध्ये शीतकरणाचे काम अतिशय चोखपणे बजावणारे संजय निर्मळ निवृत्त होत असल्याने या योजनेतील शेवटची कडी आता निवृत्त होत असून ही योजना शेवटच्या घटका मोजत आहे, ते वाचवायला हवे असे सुहास सावंत म्हणाले. 

   मनोहर पोकळे बोलताना म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ देणे आवश्यक असून मित्रपरिवार संस्था, संघटनांमध्ये सामाजिक कार्यासाठी आपला वेळ आता संजय निर्मळ यांनी द्यायला हवा. शब्दगंध चे संस्थापक सचिव बोलताना म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येत असते सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये व्यथित केल्यास निश्चितच प्रेरणादायी आयुष्य आपण जगू शकतो. यावेळी  उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव कुणाल तनपुरे, ऍड मुकुल गंधे सुधाकर रामदिन, प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे,संभाजी मगर,सौ. योगिता मुळे, निलेश निर्मळ, वृषाली निर्मळ यांनी यांनी मनोगत व्यक्त केले तर यावेळी खरे साहेब, दत्ता माळवे, जाकी अहमद, सादिक मास्टर, देशमुख साहेब, कुणाल तनपुरे, निलेश निर्मळ, दिनेश पुदाले,नितीन पुदाले विजय आरणे, दत्ता बनकर, विजय लोंढे,विजय जमदाडे, संदीप जमदाडे, नवनाथ कोरे, योगिता निर्मळ, अनिल निर्मळ, शुभम निर्मळ, अभिषेक निर्मळ, राहुल गुंड, अमीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय निर्मळ म्हणाले की, कनिष्ठ अभियंता म्हणून शासकीय दूध योजनांमध्ये मी नोकरीला सुरुवात केलेली असून शक्य होईल तेवढी समाजसेवा सेवा करताना केलेली आहे. अहमदनगर, कुर्ला, मुंबई, अमरावती,नांदुरा,बुलढाणा, परभणी, भूम,उदगीर व अहमदनगर या ठिकाणी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे.सर्वांच्या सहकार्यामुळेच ही सेवा करता आली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम निर्मळ यांनी केले तर मनोगत व्यक्त करून सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी संजय निर्मळ यांनी आभार मानले. 

सुजलग्राम सारख्या निसर्गाच्या स्थानिध्यात सेवापूर्ती समारंभ आयोजित करून उपस्थित सर्व निमंत्रितांना सुखद धक्का देण्याचं काम संजय निर्मळ यांनी केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनोहर पोकळे यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष