By : Polticalface Team ,05-05-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
लहान मुलांमध्ये विविधांगी वाचनाची आवड निर्माण ह्यावी या उद्देशाने बाल संस्कार वाचन केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सध्याच्या युगात बाल वयामध्ये मुले मोबाईल, TV च्या नादी लागल्यामुळे वाचना पासून दुरावत आहेत. आजच्या लहान बालकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी करमाळा शहरातील घोलप नगर येथील मस्कर क्लासेसच्या संचालिका सौ. महानंदा मस्कर मॅडम व त्यांचे पती श्री सिद्धेश्वर मस्कर या दोघा दांपत्याने बाल संस्कार वाचन केंद्र नुकतेच सुरू केले आहे, त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहमय वातावरणात पार पडले.
सदर बाल संस्कार वाचन केंद्राचे उद्घाटन यश कल्याणी चे संस्थापक गणेश करे पाटील व सेंट्रल स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा माने मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य कापले सर, अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे दत्तात्रेय भस्मे सर व सौ भस्मे मॅडम, वर्ल्ड कॉम्प्युटर चे दिलीप क्षीरसागर सर, तेज क्लासेस च्या सौ कापसे मॅडम, पवार क्लासेस च्या सौ. पवार मॅडम, तसेच डॉ. तुषार गायकवाड, डॉ. सौ. विनया गायकवाड, डॉ. सौ. घोलप मॅडम, डॉ. बिपीन परदेशी, सौ. अब्दुले मॅडम, अनिल हाके सर, संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, पत्रकार अलीम शेख, पत्रकार अश्फाक सय्यद, गणेश कॉम्प्युटर्स चे निंबाळकर सर, धोत्रे सर, पालक व विध्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रथमच भरविण्यात आलेल्या उपक्रमाचा सुमारे 300 वाचक वर्गाने मनमुराद लाभ घेतला असून, त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
हे वाचन केंद्र आजपासून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले झाले असून, मस्कर मॅडम यांच्या अथक प्रयत्नांमुळे या प्रकल्पाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या वाचन केंद्राचा सतत लाभ घ्यावा.
वाचक क्रमांक :