माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा 14 गावांना भेट प्रचारादरम्यान भाजपा शिंदे तसेच बागल गटातील अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

By : Polticalface Team ,07-05-2024

माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा 14 गावांना भेट प्रचारादरम्यान भाजपा शिंदे तसेच बागल गटातील अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

जेऊर प्रतिनिधी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा चौदा गावांना भेट देत झंजावती प्रचार, अनेक ठिकाणी भाजप तसेच बागल आणि शिंदे गटातील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी काल शेलगाव (वा), भाळवणी, पांगरे, कविटगाव, सांगवी (बिटरगाव), सातोली, वडशिवणे, मलवडी, निंभोरे, घोटी, वरकुटे, नेरले, आवाटी, गौंडरे या गावांना भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलता माजी आमदार पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई, वीज कपात, कांदा निर्यात, रेल्वे, रस्ते आदि प्रश्नांवर भर‌ देत मतदारां समोर विकासाचे वास्तव‌ मांडले. सन २०१४ ते १९ मधील आपल्या हातुन झालेली विकासकामे सांगितली. तसेच देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर आता या पक्षाला बळकटी मिळाली असून अनेक गावात इतर गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला. नेरले येथील काकासाहेब बळवंत पाटील, बाळासाहेब अण्णा काळे, महेश महादेव‌ अंधारे यांनी बागल गटास तर गणेश मोहन काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.या प्रचार दौऱ्यात सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, केमचे सरपंच अजितदादा तळेकर यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तर आज माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा माढा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदारांशी संवाद होणार असून लोणी, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, गवळेवाडी, बारलोणी, अकुलगाव, लहू, चिंचगाव, तडवळे, तांदुळवाडी, सापटणे, शिंदेवाडी आणि घाटणे या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या दौऱ्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून सर्वत्र तुतारीमय वातावरण निर्माण झाले आहे.

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न