By : Polticalface Team ,07-05-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानासाठी करमाळा विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या गावातील ३४२ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. या मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख मोहिते व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे. दिवेगव्हाण व वाघाचीवाडी ही मतदान केंद्रे संवेदशील असल्याचे ठरवण्यात आली आहेत. निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ७०० पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे.
सोमवारी (ता. ६) ईव्हीएम मशीन व इतर साहित्य वाटप करण्यासाठी तहसील परिसरात सकाळपासून कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. ईव्हीएम मशीन देण्यासाठी 38 टेबल ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघात बार्शी, माढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातून कर्मचारी व अधिकारी आले होते.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता 139 मतदान केंद्रांवर मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामुळे मतदारांना सावलीची व्यवस्था होणार आहे तसेच मतदारांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्याच्या माध्यमातून शुद्धपाणी देण्यात येणार आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात
3 लाख 17 हजार 928 मतदार आहेत. या मतदारांपैकी १ लाख 66 हजार 813 पुरुष मतदार आहेत. १ लाख 51हजार 114 स्रिया मतदार आहेत. तर १० तृतीयपंथी मतदार आहेत. दोन लाख 77 हजार 880 मतदारांना वोटर स्लिप पोहच करण्यात आली आहे. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एक दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे, तर कोंढारचिंचोली व महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी सर्व यंत्रणा महिला राबवणार आहेत. 342 मतदान केंद्र असुन प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अशी माहिती शेवटी तहसीलदार ठोकडे यांनी दिली
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष