By : Polticalface Team ,08-05-2024
आज अहमदनगर दक्षिण लोकसभा (अहिल्यानगर) मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मा. खासदार शरदचंद्रजी पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बाळासाहेब थोरात (मा.महसूल मंत्री, महाराष्ट्र), शिवसेना नेते संजय राऊत, आम. रोहित पवार, प्रवीण दादा गायकवाड, चंद्रहार पाटील, आम.राहूल जगताप, जयंत वाघ, अंकूश काकडे, बाबासाहेब भोस, घनःश्याम शेलार, बाळासाहेब दुतारे, सुनील गवारे, साजन पाचपुते, निलेश कराळे, अनिल ठवाळ, प्रशांत दरेकर, सुनंदा पाचपुते, टिळक भोस, स्मितल वाबळे, संतोष इथापे, एम डी शिंदे, मुकुंद सोनटक्के, सुभान तांबोळी, अख्तर शेख, हरिदास शिर्के, अरविंद कापसे इत्यादी सह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका पंचक्रोशीतील हजारो लोकं उपस्थीत होते.
यावेळी राम घोडके यांनी काँग्रेस मध्ये तर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अनिल ठवाळ आणि पंचायत समिती सदस्या अनुराधा ताई ठवाळ, गुरु गायकवाड व बाबासाहेब भोस, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिदास शिर्के यांनी केले.
प्रमुख उपस्थितीत निलेश कराळे यांनी बोलतांना सांगितले की, दाढीवाला हा फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे. सर्व प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेला. अनेक उपक्रम काँग्रेस ने केलेले आहेत. ५२० युनिव्हर्सिटी बनविल्या त्या गेल्या कोठे..?, शेतकऱ्यांच वाटोळं केलं. सिलेंडर महाग केलें. पवार साहबांनी सामान्य माणसाला उमेदवारी दिली. कारण कोरोना अडचणीत निलेश लंके पिडीतांसाठी उभा राहिला होता. असे त्यांनी नमूद केले.
आम. रोहीत पवार:
लोकांचा उस्ताह पाहून आजच निलेश लंके विजयी झाल्याचे जाहीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी कालच्या भाषनात सामाजिक द्वेष पूर्ण वक्तव्य केले. सन २०१४ आणि २०१९ च मोदी वारं ओसरलय, महाविकासचे ३५ आमदार निवडून येतील, भाजपा २०० पार सुद्धा जाणार नाही आणि लंके २ लक्ष पार जाणार आहेत. साकळाई बाबत दिलेला शब्द विखेंनी पाळला नाही. मंग जनतेने ठरवावे. कर्जत, जामखेड पेक्षा श्रीगोंद्याने निलेश लंकेना लीड द्या. असे आवाहन यावेळी रोहीत पवार यांनी सभेत केले. कुकडी, साकळाई, एमआयडीसी बाबत सकारात्मक नियोजन करणारं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निलेश लंके, उमेदवार, दक्षिण अहमदनगर:
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली घटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी, शेतकरी हितासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी हि निवडणूक महत्वाची आहे. फक्त घोषणा करायची प्रत्येक्षात काहीच नाही. पाण्याची बाटली दुधापेक्षा महाग असणाऱ्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कश्या थांबणार..? भारत देशाची काय परस्थिती.? प्रधानमंत्री हिंदू मुस्लिम वर बोलतात.. शेतकऱ्यांची अवस्था काय आहे..? कांदा.. दुधाची.. काय स्थिती..? शेतकरी गरीब राहिला पाहिजे.. अशी व्यवस्था आहे. शासकीय मेडिकल कॉलेज, शिक्षण संस्था… रस्ते बनवले नाही.. रावणाचाही अहंकार संपलाय.. तुम्ही कोण..? विकासावर बोलणं अपेक्षित आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे लक्ष्मीच दर्शन होऊनही काय होणार नाही.. श्रीगोंद्याचा ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे.. ज्याच्यात पाणी आहेना तोच पाणी देऊ शकतो.. सिंचन भवन अहमदनगरला आणनार.. मतदार संघाला पाणी कमी पडू देणार नाही.. साकळाईचा शब्द विखेंनी पाळला नाही.. मी श्रीगोंद्यात जन्मलो आहे.. मला श्रीगोंदे करांच्या ऋणातून उतराई व्हायची संधी द्या..
“तुम मुझे पाच दीन दो.. मै पाच वर्ष दुंगा” असे लंके यांनी नमुद करुन भाषण संपन्न केले.
खा.संजय राऊत, शिवसेना नेते:
निलेश लंके मधील शिवसैनिक जागा आहे. धमण्यात भगव रक्त आणि विचार आजही कायम आहे. श्रीगोंद्यातील जनता जागरूक आणि अभ्यासू आहे. महाराष्ट्रातील मोजक्या जागा पैकी विना प्रचाराची विजय होणारी जागा लंकेची आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने लंकेच्या पाठीमागे उभे आहेत. इंग्लीश बोलण्यापेक्षा संसदेत सामान्यांचे कामं केले का..? याचा लेखाजोखा घ्या.. गेल्या दहा वर्षात मोदी कधी महाराष्ट्रात आले की, आठ दिवसांपूर्वीच समजायचं, मात्र काल नगर मध्ये आल्याचे आज समजलं.. यावेळी प्रभु राम, कृष्ण, आणि तेहत्तीस कोटी देवांनीच ठरवलय.. मोदींना पाडायच.. सबसे तेज झुट बोलनेवाला प्रधानमंत्री मोदी.. त्यांची हुकूमशाही सुरू झाली आहे. या हुकूमशाही विरोधात आंदोलन सुरू झाले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या तेजाने तळपून देशवासीयांना अधिकार दिले. ते संविधान बदलण्याची भूमिका मोदींनी हाती घेतली आहे.
बाळासाहेब थोरात, मंत्री, महाराष्ट्र राज्य:
हजारो लोकं स्व. इच्छेने जमत असुन, शेवटपर्यंत निवडणुकीत सक्रीय रहावे लागणार आहे. निलेश लंके मनापासुन कामं करणारा आमदार, कोरोनात रात्र दिवस आपल्या माणसात राहणारा कार्यकर्ता आहे. सर्वांनी सहकार्य करावे. पंत प्रधानांच्या सर्व सभा फेल आहेत. त्यांचे राजकारण गुजरात केंद्रीभूत आहे. पैश्यावाला, सत्ता, संपत्ती संपन्न असलेल्या नेत्या विरुद्ध निलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन थोरतांनी केले.
शरदचंद्र पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार):
निलेश लंके यांच्या साठी उस्फुर्त जमलेल्या लोकांचे स्वागत पूर्वी एक दोन दिवसांत निवडणूक व्हायची.. महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात का..? निवडणूक वेळापत्रक बदललं.. लोकशाही संकटात आहे. संसदीय लोकशाहीची चिंता देशात निर्माण झाली आहे. अशी परस्थिती निर्माण झाली असताना नगर परिषद, जिल्हा परिषद, आणि ग्रामपंचायत निवडणूक नाही.. तर, पुढें एक काळ विधान सभेच्या निवडणुका टाळल्या जातील..! या निवडणकीत लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आपण घ्यायची.. अनेक प्रधानमंत्री कालखंडात मी कामं केलय.. यासोबत सामाजिक, राजकीय, शेतकरी प्रश्न आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणी संदर्भात पवार यांनी चर्चा केली. आणि निलेश लंके यांना बहुसंख्य मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष