बेंद ओढ्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जन आंदोलन या दोन्हीची गरज - सुनील तळेकर
By : Polticalface Team ,09-05-2024
करमाळा प्रतिनिधी राजकारण बाजूला ठेऊन बेंद ओढ्याचे योग्य पुनर्जीवन झाल्यास हजारो एकर वाढीव क्षेत्र ओलिताखाली येईल. जो पर्यंत बेंद ओढ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शंभर टक्के माढा तालूका सिंचनाखाली आला असे म्हणता येणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक सुनील तळेकर यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की १९९५ पासुन बेंद ओढ्याचा प्रश्न सुटत नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा हा जलसंधारण प्रकल्प असून २०००० हुन अधिक पाणलोट क्षेत्र यावर अवलंबुन आहे. सुमारे ३४ किमी लांबीचा हा जलस्त्रोत केवळ ओढा नसुन ही एक लहान नदीच आहे. जवळपास तेरा गावाहुन अधिक गावांच्या शेती प्रश्नाशी निगडीत असल्याने बेंद ओढा प्रश्न कायमचा सुटणे गरजेचे आहे. सध्या दुष्काळ वजा सदृश पाणी टंचाई जाणवत असुन कुर्डु, पिंपळखुटे, ढवळस, पिंपरी, भोसरे, भोगेवाडी, वडाचीवाडी यासह अन्य गावांना बेंद ओढ्याचे महत्व जाणवत आहे. मानेगाव उपसा सिंचन योजना असो वा बार्शी उपसा सिंचन योजनेत माढा तालुक्यातील पाच गावांचा समावेश असो, ही कामे महत्वाची आहेत. परंतू या कामासाठी जेवढा पाठपुरावा लोकप्रतिनिधी कडून होतो तेवढा पाठपुरावा बेंद ओढा पुनर्जीवन करण्यासाठी होत नाही. यामुळेच मग नाम सारख्या पाणी फौंडेशनच्या माध्यमातून या ओढ्याचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला गेला. आज भोसरे गावाचा उत्तरेकडील भाग हा पाण्यापासून वंचित आहे. बेंद ओढ्यातुन तीन किमी बंदीस्त पाईपलाईन द्वारे जर वनविभागाच्या तळ्यात पाणी आणता आले तर हा भाग ओलिताखाली येईल. असे एक ना अनेक लहान मोठे प्रश्न बेंद ओढ्याचा मुळ प्रश्न सुटल्यावर आपोआपच सुटतील. सुमारे 60 लहान-मोठ्या चेक बंधा-यांची जर किरकोळ दुरुस्ती केली गेली तर पाण्याचा वापर अधिक फायदा मिळवून देईल. बेंद ओढ्यातील पाणीसाठा सुधारण्यासाठी डिसिल्टिंगची गरज आहे. खोलीकरण आणि रुंदीकरण ही कामे जवळपास नऊ किमी हुन अधिक क्षेत्रात काही प्रमाणात झाली आहेत. बेंद ओढ्यास राज्यशासनाच्या मोठ्या निधीची गरज आहे. जर योग्य प्रमाणात निधी उपलब्ध केला गेला तर बेंद ओढा हा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायीनी ठरेल. पण तरीही आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबित का राहीला जातोय याबद्दल मोठ्या प्रमाणात चिंतन होऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत सुनील तळेकर यांनी व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी