By : Polticalface Team ,10-05-2024
अनिल गायकवाड, दौंड प्रतिनिधी
दौंड ता ०९ मे २०२४ दौंड तालुक्यातील मौजे देऊळगाव गाडा ता दौंड जिल्हा पुणे, येथील खासगी जमीन मध्ये गौण खनिज माती मुरूम चोरीचा प्रकार अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू आहे, पोकलेन जीसीबिच्या साह्याने माती मुरुम उत्खनन करून, हायवा डंपरने वाहतूक केली जात आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना या वाहतुकीचा ना हक्क त्रास सहन करावा लागत आहे,
सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक मातीच्या धुळीमुळे होणारा त्रास जेष्ठ नागरिकांसह इतर सर्व सामान्य माणसाच्या आरोग्याची खेळ सुरू आहे, हा सर्व प्रकार देऊळगाव गाडा खाजगी शेतामध्ये माती मुरुम उत्खनन सुरू आहे,
या संदर्भात तहसील कार्यालय महसूल विभाग यांच्याकडून कोणतीही रितसर परवानगी नसताना रात्रंदिवस भर दिवसा हा बेकायदेशीर गौण खनिज मुरुम चोरीचा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनमध्ये चर्चा होत आहे,
या संदर्भात दौंड तहसीलदार मा ए एस शेलार साहेब यांच्याकडे मुरुम चोरी बाबत खबर व तक्रार संपर्क साधुन केली होती, या अनुषंगाने मा तहसीलदार यांनी महसूल संबंधित गाव कामगार तलाठी यांना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र गाव कामगार तलाठी व गाव कोतवाल यांनी सदर ठिकाणी कोणत्याही कारवाई केली नाही, या वेळी दिवसभर सुरू असलेले उत्खनन तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, गुरुवार दि,०९ मे रोजी रात्रीच्या अंधारात पोकलेन जीसीबिच्या साह्याने मुरुम उत्खनन करून रात्रभर हायवा डंपर ने वाहतूक सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनमध्ये चर्चा सुरू आहे,
महसूल विभाग देऊळगाव गाडा, मंडल अधिकारी आणि गाव कामगार तलाठी यांचे अर्थपूर्ण जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, अशी नागरिकांनमध्ये बोलले जात असुन पंचक्रोशीत चर्चा होत आहे, गौण खनिज माती मुरुम लँड माफिया यांची ही मोठी दहशत या भागात असल्याने सर्व सामान्य नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, मंडल- तलाठी अधिकारी या परिसरातील अवैध माती- मुरुम चोरी बाबत, अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई महसूल विभागाने केलेली दिसून येत नाही, या ठिकाणी सरकारी गौण खनिज बाबत, लाखो रुपयांचा सरकारी महसुल बुडवला जात आहे, हा प्रकार अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेकायदेशीर माती मुरुम चोरी बाबत, दौंड महसूल तहसीलदार सौ भंडारे मॅडम कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
देवळगाव गाड येथिल मुळ मालक शेतकऱ्यांनी दौंड तहसील कार्यालय महसूल विभागाची कायदेशीर परवानगी घेऊन माती मुरुम उत्खनन करावे, तसे न केल्यास त्यांच्या
विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांनकडून बोलले जात आहे, या बाबत दौंड महसूल विभागाच्या अंतर्गत देऊळगाव गाडा गाव कामगार तलाठी साहेब कायदेशीर पंचनाम करून कारवाई करतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक