पेडगाव येथील हजरत पीर दुधारी शाह बाबा यांचा आज उर्स, ऊर्स शरीफ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
By : Polticalface Team ,10-05-2024
श्रीगोंदा. - सालाबाद प्रमाणे पेडगाव येथील हजरत पीर दुधारी बाबा यांचा उर्स शरीफ मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे . त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उर्स कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे . आज शुक्रवार दिनांक 10 मे रोजी दुपारी ५ वाजता भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे . रात्री
९ वाजता नागपूर येथील प्रसिद्ध कव्वाल शाकीर - जाकिर गुलाम चिश्ती यांच्या कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे तर शनिवार दिनांक 11 मे रोजी रात्री नऊ वाजता सुपरस्टार धमाका ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे . अलीकडील काळात श्रीगोंदा तालुका हा मल्लांचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे . त्याप्रमाणे पेडगाव हे देखील ऐतिहासिक गाव असून या गावातही अनेक मल्ल आहेत ज्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी कुस्त्या करून पेडगावचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला आहे . या गावात कुस्ती शौकींनांचीही कमी नाही . दुपारी ५ वाजता कुस्त्यांचा आखाडा सुरू होणार आहे . रात्री आठ वाजता नागपूर येथील प्रसिद्ध कव्वाल शाकीर - जकिर गुलाम चिश्ती यांच्या कव्वालीचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे . तर शनिवारी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास तालुक्यातील कुस्तीप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आवाहन उर्स कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
वाचक क्रमांक :