मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाठ यांचे मतदारांना आवाहन

By : Polticalface Team ,12-05-2024

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाठ यांचे मतदारांना आवाहन लिंपणगाव प्रतिनिधी:- लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही.भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची घोषणा केलेली असून येत्या १३ मे २०२४ रोजी ३७-अहमदनगर आणि ३८-शिर्डी (अ.जा.) मतदारसंघात मतदान होणार आहे. यादिवशी आपण व आपल्या कुटुंबीयांनी मतदान करण्यास अवश्य यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमाठ यांनी केले आहे.आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची ३७-अहमदनगर किंवा ३८-शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे आहेत, तथापि शिक्षण व नोकरी निमित्ताने अन्य ठिकाणी राहत असतील, तर ते जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. तसेच दिनांक ११ मे आणि १२ मे रोजी शनिवार आणि रविवार आहे, त्यामुळे त्यांनाही लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी बोलावून त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे.मतदानाला येतांना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना, फोटो असलेले बैंक पासबूक, मनरेगा जॉब कार्ड इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे. मतदार ओळख चिठ्ठी आपणांस घरोघरी पाठविली आहेच. त्याव्यतिरीक्त मतदार ओळख चिठ्ठी (Voter Slip) निवडणूक आयोगाच्या electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावरुन काढता येईल. यामुळे आपणांस आपल्या मतदान केंद्राचा पत्ता व मतदार यादीतील आपला अनुक्रमांक याची माहिती होईल व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपले मतदान सुलभ होईल. मात्र ही चिठ्ठी ओळखीचा पुरावा म्हणून गृहीत धरता येणार नाही.मतदानाच्या दिवशी ahmednagar.nic.in किंवा https://vqms.online या लिंकवर क्लिक करुन मतदानासाठी किती वेळ लागेल याची माहिती देखील प्राप्त करु शकता. मतदान केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही, यासाठी मी व माझ्या सहका- यांनी पुरेशी काळजी घेतली आहे. आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा जेष्ठ नागरीक असल्यास त्यांचेसाठी "Saksham App" वर देखील नोंदणी करणे शक्य आहे. त्यांचेसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करणेत येईल. आपल्यासोबत लहान मुले असल्यास त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सावली, प्राथमिक औषधोपचार, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या पत्राचे आपल्या परिवारासह सामुहिक वाचन करुन त्याचा व्हिडीओ ९००२१०९००३ या व्हॉटसअप क्रमांकावर मला जरुर पाठवावा व मतदानाचा हक्क बजावून आपली सेल्फी देखील जरुर वरील क्रमांकावर पाठवून अहमदनगरच्या इतिहासात आपल्या मताची नोंद करावी. मतदानाविष आपणांस काही अडचण असल्यास आमच्याशी १९५० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमाठ यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.