By : Polticalface Team ,14-05-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रारी, निवेदने देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. माढा तालुक्यातील खासदार वेळोवेळी प्रयत्न करत आहेतच परंतु यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील व्यापारिक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, कामगार आणि प्रवाशांना न्याय देण्याची गरज आहे.
ही एक्स्प्रेस गाडी येथे थांबत नसल्याने पुणे, दौंड, जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हुतात्मा एक्स्प्रेस सध्या सोलापूरहून सुटते. पण जेऊरला आरक्षित तिकीट करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे सांगत याठिकाणी थांबा मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याचे सांगितले.
पण, दिवसेंदिवस प्रवासी वाढतच असताना, व आरक्षण ही वाढत आहे असे दिसून येते तरी पण प्रवाशी नाही, असे रेल्वेकडून कसे कायम सांगण्यात येते, त्यामुळे असा सवाल उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने पुन्हा हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा द्यावा आणि नंतर किती प्रवासी जेऊरहून प्रवास करतात, याची प्रचिती घ्यावी, अशी मागणी होत आहे. जेऊर येथे थांबणारी हैद्राबाद एक्स्प्रेस मध्ये असंख्य प्रवासी जेऊर स्थानकावरून चडतात व उतरतात, तसेच हैदराबाद मुंबई एक्सप्रेस या गाडीला स्लीपर कोच कमी केलेली असून 2 स्लीपर कोच सद्यस्थिती त आहेत त्यामुळे स्लीपर कोच चे गर्दी व जनरल डब्यांची गर्दी जेऊर स्थानकावर खूप प्रचंड आहे त्यामुळे प्रवासी एसी कोच मध्ये सुद्धा चढतात व दारामध्ये लटकून जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे त्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या अशा प्रचंड गर्दीमुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वेळोवेळी प्रवासी संघटनेने ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तरीही प्रशासन यावर ठोस भूमिका घेत नाही, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे हाल होत आहेत, दरम्यान, प्रवासी संघटना, रेल्वे प्रवासी, नागरिक, आमदार, खासदार, रेल्वे प्रशासनाला विनंती तसेच तक्रारी करून, निवेदने देऊन, आंदोलनाचे इशारे देऊन जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण, रेल्वे प्रशासनास जाग आली नाही. जेऊर हे करमाळा, जामखेड, परांडा, या तालुक्यांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, त्याचा विकास अमृत भारत योजनेतून होत असून, एक्स्प्रेस गाड्या येथे थांबवाव्यात, यासाठी आंदोलन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
-------
हुतात्मा इंटरसिटी थांब्यासाठी खासदारांनी केला होता पाठपुरावा
हुतात्मा एक्स्प्रेस थांबविण्यासह विविध अडचणींबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभाग, मध्य रेल्वे व रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा वारंवार पाठपुरावा केला परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील प्रवाशांचे म्हणणे आहे. असंख्य ग्राहक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी वर्ग, पुणे, मुंबई कडे दररोज ये जा करतात.त्यामुळे जेऊरला हुतात्मा एक्स्प्रेसला थांबा मिळणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
------
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष