By : Polticalface Team ,14-05-2024
श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने सदैव कटीबध्द रहाणार असुन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रेम हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी केले.
सध्या लोकसभेची निवडणुक प्रक्रिया चालू असल्यामुळे राजेंद्रदादा नागवडे यांचा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर अतिशय साध्या पध्दतीने साजरा करणेत आला. प्रथम तालुक्याचे भाग्यविधाते स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले. तदनंतर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यतेखाली झालेल्या छोटेखानी सभेत नागवडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले स्व. बापुंनी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या सर्व संस्था नावलौकीकास आल्या. बापुंच्या सामाजिक व राजकिय कार्याचा वसा आणि वारस घेवून त्यांचा नावलौकीक टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल आहोत. बापू गेल्यानंतर गेल्या ५-६ वर्षात निश्चीतच मान उंचावेल असे काम सहकारी संचालक व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केलेले आहे. नागवडे परिवाराने गेली ५०-६० वर्षापासुन समाजाची बांधीलकी स्विकारुन सचोटीने काम केले असल्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनतेनेही नागवडे परिवारावर भरपूर प्रेम केले आहे. हीच माझ्या जीवनातील खरी शिदोरी असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरुन बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले की, स्व. शिवाजीराव नागवडे हे दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यामुळे त्यांनी ४० वर्षापुर्वी राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले पॉलिटेक्निक बेलवंडी येथे सुरु केले. शिक्षण संस्था सुरु केल्या त्यामुळे तालुक्यातील हजारो मुला-मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. कृषी, ऊर्जा, दळणवळण, सहकार, शिक्षण, साहित्य, कला, क्रिडा या प्रत्येक क्षेत्रात बापुंनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचा वारसा राजेंद्रदादा नागवडे समर्थपणे चालवत आहेत ही अभिमानाची बाब असुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याची आवश्यक आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, अॅङ विठ्ठलराव काकडे, कामगार नेते कॉ. आनंदराव वायकर, सतिष मखरे, प्रा. सतिषचंद्र सुर्यवंशी आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन नागवडे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री राकेश पाचपुते, अनिलमामा पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, बंडूतात्या जगताप, शरदराव जगताप, भाऊसाहेब नेटके, संदिप औटी, मारुती पाचपुते, लक्ष्मण रायकर, दत्तात्रय काकडे, प्रा.सुरेश रसाळ, विठ्ठल जंगले, सावता हिरवे, प्रशांत शिपलकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत दरेकर, श्रीनिवास घाडगे, योगेश भोयटे, भाऊसाहेब बरकडे, कैलासतात्या पाचपुते, सुरेश लोखंडे, दिनेश इथापे, अॅङ अशोक रोडे, लौकीक मेहता, धनसिंग भोयटे, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, विलास काकडे, किसनबापू नलगे विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सतिष जांभळे व सर्व खातेप्रमुख, कामगार व कार्यकर्ते, ज्ञानदीप व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेतील सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ संचालक सुभाष शिंदे यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले तर संचालक भाऊसाहेब नेटके यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :