श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी अवकाळी पावसाचा शेती पिकाचे मोठे नुकसानवांगदरीत अवकाळी पावसाने झाडे पडली विजेचे खांब व तारा तुटल्या विद्युत पुरवठा खंडित

By : Polticalface Team ,15-05-2024

श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी अवकाळी पावसाचा शेती पिकाचे मोठे नुकसानवांगदरीत अवकाळी पावसाने झाडे पडली विजेचे खांब व तारा तुटल्या विद्युत पुरवठा खंडित

  नंदकुमार कुरुमकर  लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी१३ मे रोजी  सायंकाळी सातच्या दरम्यान अवकाळी व गारांचा पाऊस पडल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने वाढलेला ऊस व हाता तोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी सायंकाळी अचानक ढग जमा होऊन सुसाट वारा वेगाने वाहू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला कांदा झाकण्यासाठी कांदा उत्पादकांची मोठी त्रिधातिरपट उडाली; तर अनेक शेतकऱ्यांचा सात ते आठ महिने वाढलेला ऊस या वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येण्यासारखे नुकसान झाले. सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत भयंकर असून सूर्य मोठ्या प्रमाणात आग उत्पन्न दिसत आहे. या अतिउष्णतेमुळे आहे; त्या पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील अत्यंत गंभीर बनला गेला आहे. दरम्यान चालू वर्षी उन्हाळी हंगाम मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने साधारणता ९.३० ते सायंकाळी 5:30 पर्यंत जवळपास तापमान 40 अंशाच्या पुढे कायम राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उन्हाळी हंगाम अबाल वृद्धांसह सर्वांनाच मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचा जाणवत असल्याचे बोलले जात आहे.


    गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी वादळी वाऱ्या बरोबर बरसत असल्याने सायंकाळी गारवा निर्माण होताना जाणवतो. परंतु पुन्हा सकाळी उष्णतेची लाट तयार होऊन सर्वत्र गरमागरम वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस हा अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्रासदायक समजला जातो. दिवसभर कांदा उत्पादक कांद्याच्या वखारी उघडा ठेवतात. अशावेळी मात्र अवकाळी पाऊस अचानक चक्रीवादळ घेऊनच येतो आणि कांदा उत्पादक व शेतकऱ्यांची धांदल ओढून देतो. श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परंतु हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या दुःखात भर घालणारा असल्याने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्ये लिंबू; आंबा इत्यादी फळझाडांचे मोठे नुकसान होताना दिसते. दोन दिवसापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुका कृषी विभागाने तालुक्यातील प्रत्येक गावातील फळबागा व उभ्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसते. कारण शेतकरी मोठ्या संकटातून शेती पिकाचे रक्षण करत आहे. एकीकडे शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या धर्म संकटात आहे. 


      तालुक्यातील वांगदरी येथे सोमवारी 13 मे रोजी सायंकाळी झालेला अवकाळी गारांचा पाऊस व वाऱ्यामुळे विजेचे खांब व तारा तुटल्यामुळे गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून; मोठ्या प्रमाणात झाडे देखील जमीन दोस्त झालेले आहेत. त्यामुळे येथील दळणवळण व्यवस्था कोलमडली गेल्याचे केल्याचे समजते. दरम्यान तेरा मे रोजी लोकसभा निवडणुक पार पडली. सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर मत पेट्या जमा करताना मतदान कर्मचाऱ्यांना देखील या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा काही त्रास सहन करावा लागला तशा भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.