सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे सन 2023 24 चे 27०० प्र. मे. टनाचे संपूर्ण पेमेंट बँकेत वर्ग चेअरमन राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,18-05-2024

सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे सन 2023 24 चे 27०० प्र. मे. टनाचे संपूर्ण पेमेंट बँकेत वर्ग चेअरमन राजेंद्र दादा नागवडे

लिंपणगाव प्रतिनिधी :   सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2023 --24 मधील गाळप केलेल्या पाच लाख 85 हजार 740 मे. टनाचे रूपये 2700 प्र. मे.  टनाप्रमाणे संपूर्ण पेमेंट ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर  वर्ग केले  असून उर्वरित रक्कम दीपावली पूर्वी अदा केली जाणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले. 

            कारखान्याच्या सन 2024-25  गळीत हंगामाच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी मिल रोलर पूजन समारंभात नागवडे बोलत होते. प्रथम कारखान्याचे संचालक योगेश भोईटे व संदीप औटी यांच्या शुभहस्ते रोलरची विधीवत पूजा करण्यात आली . तदनंतर व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागवडे पुढे म्हणाले की, स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा आणि वसा घेऊन कारखान्याचे संचालक मंडळ सभासद, शेतकरी व कामगार यांच्या हिताला सातत्याने प्राधान्य देऊन काटकसरीने कारभार करत आहे.  मार्च महिन्यातील ऊस गाळपाचे प्र. मे. टन रु. 2700 याप्रमाणे सर्व पेमेंट कारखान्याने बँकेत वर्ग केले असल्यामुळे सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांच्यामध्ये समाधानाचे व विश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे.  सध्या सहकारी साखर कारखान्यांसमोर अनेक अडचणी आहेत. तरीही नागवडे कारखाना ऊस दराबाबत कधीही मागे राहिलेला नाही व उद्याच्या काळातही राहणार नाही. आज रोलर पूजन झाले म्हणजे गळीत हंगामाची तयारी वेगाने करावी लागणार असून सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे. कारखान्याचे उच्चांकी गाळप करण्याकरिता ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले. 

             अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले की, गतवर्षी अनेक संकटांवर मात करून राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने 6 लाखापर्यंत गाळप करण्याचा प्रयत्न केला परंतु उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. चालू वर्षी मात्र गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे करिता आपल्यातील त्रुटी दूर करून सर्वांनी एक दिलाने काम करावे. नागवडे कारखान्याने आज अखेर सभासद, कामगार, शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम,  व्यापारी यांना केंद्रस्थानी मानून योग्य न्याय दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी स्वीकारून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भोस यांनी केले. 

          कार्यक्रमास संचालक सर्वश्री सुभाष शिंदे, श्रीनिवास घाडगे, भाऊसाहेब नेटके, शरद जगताप,  डी. आर. आबा काकडे,  प्रशांत शिपलकर, विश्वनाथ गिरमकर,  विठ्ठल जंगले,  सावता हिरवे,  बंडू जगताप, लक्ष्मण रायकर, भाऊसाहेब बरकडे,  ह.भ. प. भाऊसाहेब मासाळ,  प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे व, चीफ इंजिनिअर दत्तात्रय तावरे,  प्रोडक्शन मॅनेजर नाना कळमकर,  मुख्य शेतकरी सचिन बागल तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते. श्री. भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर संचालक सावता हिरवे यांनी आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी