By : Polticalface Team ,24-05-2024
लिंपणगाव/प्रतिनिधी -दी.२३ मांडवगण फराटा (ता. शिरुर ) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत तब्बल पंचवीस वर्षांनी १९९८-९९ मधील दहावीच्या सवंगड्यांचा पुन्हा किलबिलाट सुरु होता.
येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत १९९८-९९ या सालात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षक अशोक वेदपाठक हे होते. सूत्रसंचालन अनिता फराटे - निंबाळकर यांनी केले.
पंचवीस वर्षांपुर्वी सर्वजण दहावीपर्यंत एकत्र शिकले. यानंतर सर्वच विद्यार्थी शिक्षण, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या वाटांनी निघुन गेले. परंतु लहान असतानाच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. यातुनच सर्वजण व्हॉटस् अप ग्रुपवर पुन्हा एकत्र आले. परंतु प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र येत नव्हता. सर्व सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी मनोहर फराटे, अमोल जगताप,सचिन घाडगे, अभिषेक दरेकर,सुधाकर जगताप,सागर फराटे,अभिजित जगताप, गणेश फराटे,गोरख राऊत, महादेव नागवडे,हनुमंत भोसले, नारायण परदेशी, राहूल कुंभार,जगदीश गायकवाड,विजय जाधव,अजित गवळी,अमोल नागवडे,सोमनाथ कदम,संदिप बंड यांनी प्रयत्न केले. वैशाली फराटे यांनी प्रत्येकास एक झाड भेट म्हणून आणले तसेच नानासो लगड यांनी गुलाबाची फुले आणली होती,या बॅचचे सर्व विद्यार्थी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत.जे आर्मीत होते,उच्च शिक्षण घेऊन परदेशात गेलेत यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अनेक मुले व मुलींनी शालेय जीवनातील आपल्या गमती जमती सांगुन उपस्थितांना कधी भावनिक केले तर कधी पोट धरुन हसवले.आपल्या १० वीच्या वर्गात जाऊन बसणे,संगित खुर्ची खेळणे,धावण्याची स्पर्धा लावण्यात आल्या.असे विषेश नियोजन आयोजकांनी केले होते.
यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक रमेश ठाकुर,मुख्याध्यापक रामदास चव्हाण, अशोक वेदपाठक, गोरक्षनाथ दळवी, बबनराव सोनवणे, साहेबराव काळे, रघुनाथ हंडे,विशाल डोके, बाळासाहेब काकडे, सुभाष पाचकर, शिवराम काळे, गणपत बोत्रे,देवी विजया , शशिकांत मुळे, सुनील थोरात, संतोष परदेशी, मिलिंद निंबाळकर, रामदास खोमणे, आदी शिक्षक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :