By : Polticalface Team ,31-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ३०/०५/२०२४ रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील बंगला साईड बंद रेल्वे कॉलनी येथे काही इसम स्वताचे फायद्या करीता तीन पंत्ती नावाचा जुगार खेळून जुगारात पैसे लावून खेळत व इतरांना खेळवित आहे अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, तसेच हजर असताना पोलीस हवालदार एस.एन.वारे पोलीस हवालदार शैलेंद्र केशव रणसिंग पो.कॉ. योगेश मनोहर,पो कॉ. गोलांडे पो.कॉ,किशोर हनुमंत वाघ अमोल रामदास गारूडी पोलीस कॉन्सटेबल, सह मौजे दौंड गावचे हद्दीत बंगला साईड बंद रेल्वे कॉलनी या ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी इसम नामे १) साईनाथ अशोक थोरात वय ३६ वर्षे रा.दौंड ता. दौंड जि. पुणे २) दत्ता पोपट देवकाते वय ३७ वर्षे रा. बोरीबेल ता. दौंड जि. पुणे. ३) मार्कस बाबूराव गायकवाड वय ४७ वर्षे रा. गोवागल्ली दौंड ता. दौंड जि. पुणे. ४) सागर सूनिल मैराळ वय ३० वर्षे रा. दौंड ता. दौंड जि.पुणे. ५) मुसा मोहब्बू बाबूडे वय ४८ वर्षे रा. येरवडा पुणे. ६) ईस्माईल बाबूमिया शेख वय ४७ वर्षे रा. सरपचंवस्ती, गोपाळवाडी रोड दौंड ता. दौंड जि. पुणे. ७) जॉन ऑनथोनि फिलीप्स वय ५२ वर्षे रा. दौंड ता. दौंड जि.पुणे. यांचे ताब्यात ५२ पत्याचे दोन कॅट सह एकूण ४,६२०/-रूपयेचा जुगाराचा मुद्देमाल मिळून आला असून सदर इसमांनवर दि ३० मे २०२४ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे कायदेशिर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पोलीस हवालदार महेश भोसले पुढील तपास करीत आहेत. सदरची कारवाई ही :मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमूख साो पुणे ग्रामीण. मा.अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती विभाग बारामती., उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव दौंड उपविभाग दौंड. यांचे मार्गदर्शनाखाली.पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस हवालदार एस. एन. वारे. पोलीस हवालदार शैलेंद्र केशव रणसिंग पो. कॉ. योगेश मनोहर गोलांडे पो.कॉ. किशोर हनुमंत वाघ.अमोल रामदास गारूडी यांनी सदर कामगिरी बजावली आहे.
वाचक क्रमांक :