मनू ऐवजी सुपीक डोक्याच्या केसरकराच्या विचाराचाच शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करावा,,,,,, दशरथआण्णा कांबळे यांची केसरकरावर प्रखर टीका

By : Polticalface Team ,31-05-2024

मनू ऐवजी सुपीक डोक्याच्या केसरकराच्या विचाराचाच शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करावा,,,,,, दशरथआण्णा कांबळे यांची केसरकरावर प्रखर टीका करमाळा-प्रतिनिधी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी, ज्या मनुस्मृतीने माणसाचे माणुसपण व जगण्याचे अधिकार हिरावून घेतला. अशा अन्यायकारी मनुस्मृतीचे दहन आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी केले. आणि संपुर्ण बहुजन समाजाला मनुच्या कायद्यातुन सोडविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अशा मनुस्मृतीला परत एकदा शालेय पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातुन, विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या सवयी आणि शिक्षण देण्याचा जणू विढा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर याने घेतलेला दिसून येतो. त्यामुळे मनुच्या विचारांना चांगले म्हणत, त्या विचारांना पाठ्यपुस्तकात आणणाऱ्या सुपीक डोक्याच्या केसरकराचेच महान विचार पाठ्यपुस्तकात छापून आले पाहिजेत. अशा प्रकारची टिका शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी केली आहे. पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, ज्या मनुस्मृतीने माणसाचे माणुसपणच हिरावून घेतले. त्याचप्रमाणे कोणत्याही समाजातील महिलांना फक्त दुय्यम दर्जाचे स्थान दिले. महिला हि फक्त उपभोगाचे साधन समजले, तिला चुल आणि मुल या व्यतिरिक्त कोणता ही अधिकार दिला नाही. मनुस्मृतीने फक्त वर्णव्यवस्थेलाच आधारभुत मानुन, तीच जीवन जगण्याची पद्धती बनविली. आणि याच वर्णव्यवस्थेला धरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता. छत्रपती शाहु महाराजांसोबत सुद्धा याच मनुस्मृतीमुळे वेदोक्त प्रकरण घडले होते. या सर्वांचा बदला म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याचप्रमाणे कित्येक शतके फक्त काही जातींवर अमानूषपणे अत्याचार करण्यात आले. हि सर्व मनुस्मृतीची शिकवण पाहता, शालेय अभ्यासक्रमात ह्या मनुस्मृतीच्या श्लोकांचा किंवा इतर काही बाबींचा समावेश करुन, परत एकदा बाबासाहेबांनी तह हयात ज्या मनुस्मृतीला विरोध करुन माणसाला माणुसपण मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. अशा मनुस्मृतीला जीवंत करण्यासाठी मनुचा वंशज दिपक केसरकर तोंड वर काढू पाहत आहे. परंतु केसरकरला आम्ही एकच इशारा देणार आहोत, मनुला मानणाऱ्या केसरकर सारख्या पिलावळीने गळ्यात गाडगं, पाठीला झाडू, अंगावर कोणती ही वस्त्र न घालता, कसल्याच प्रकारची संपत्ती धारण न करता तसेच सर्व अधिकार विहिन तुम्ही फक्त दहा वर्षे जगुन दाखवावे! परत मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा विचार करावा. अन्यथा तुमच्या सारख्या मनुच्या अवलादिना येत्या काळात आम्ही सोलापूर जिल्हा बंदी करणार हे मात्र नक्की!!! अशा प्रकारचा कडक इशारा यावेळी दशरथआण्णा कांबळे यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष