गेल्या पन्नास वर्षात नागवडे कारखान्याने कामगारांना सन्मानाची वागणूक दिली अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,02-06-2024

गेल्या पन्नास वर्षात नागवडे कारखान्याने कामगारांना सन्मानाची वागणूक दिली अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

     लिंपणगाव ( प्रतिनिधी) -सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे असून नागवडे कारखान्याचे कामगार हे नागवडे परिवारातील घटक असल्याचे मानूनच गेले 50 वर्षात कामगारांना सन्मानाची वागणूक दिली व कामगारांनी कारखाना आपला समजूनच काम केल्यामुळे कारखाना यशस्वीरित्या वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले. 

          एक जून रोजी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यातील 26 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सदर प्रसंगी त्यांना फेटाबांधून व पूर्ण पोषख देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. सदर प्रसंगी नागवडे बोलत होते. यावेळी नागवडे पुढे म्हणाले की,  कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे असल्यामुळे स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांनी कामगारांना आपल्या परिवारातील सदस्य समजून सन्मानाची वागणूक दिली. तोच संस्कार आज अखेर जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. परंतु काळाच्या ओघात झालेले बदल,  खाजगीकरणाशी वाढलेली स्पर्धा  व सहकारी साखर कारखानदारी समोरील आव्हाने पेलण्याकरिता या पुढील काळात कामगारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारखान्यातील सेवेमुळे कामगारांची आर्थिक कौटुंबिक व शैक्षणिक प्रगती झाली. त्यांची मुले मुली उच्च शिक्षित झाले असून विविध क्षेत्रात त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक सुबत्ता वाढलेले असून सामाजिक उंची वाढलेली आहे. त्यामुळे भावी काळात सहकारी साखर कारखानदारी  टिकविण्याचे उत्तरदायित्व संचालक मंडळांबरोबरच कामगारांचेही आहे . सभासद शेतकऱ्यांनी व संचालक मंडळाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरिता कामगारांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मोठ्या जिद्दीने व आत्मीयतेने काम करावे लागणार आहे. अन्यथा सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही.

         अध्यक्षपदावरून बोलताना साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांनी कामगारांना सातत्याने सन्मानाची वागणूक दिली. कामगारांचे प्रश्न सोडविणे करिता कधीच टाळाटाळ केली नाही. तोच वारसा राजेंद्रदादा नागवडे यांनी चालविला आहे. अन्यत्र अशी परिस्थिती नाही . गेल्या कित्येक वर्षात कामगारांच्या मागण्यांकरिता कधीही आंदोलन करण्याची वेळ आली नाही. नागवडे यांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवून सभासद, शेतकरी व कामगार यांना योग्य न्याय दिलेला आहे. त्यामुळे नागवडे परिवाराची विश्वासार्हता ही फार मोठी आहे.  कामगार संघटना सदैव भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. 

          सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे म्हणाले की,  श्रीगोंदा तालुका वैभवाच्या शिखरावर उभा करण्यामध्ये नागवडे परिवाराचे योगदान हे सर्वश्रेष्ठ असून तालुक्याच्या आजच्या सर्वांगीण विकासाच्या मुळाशी नागवडे सहकारी साखर कारखानाच आहे. 

         सदर प्रसंगी संचालक विठ्ठल जंगले, सावता हिरवे, मारुती पाचपुते तसेच चंद्रकांत लबडे, दिनेश इथापे, मधुकर काळाने, दिलीप कळसकर, संजय कळसकर, संजय लबडे, कुंडलिक शिर्के सर यांच्यासह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे, चीफ इंजिनिअर दत्तात्रय तावरे,  प्रोडक्शन मॅनेजर नाना कळमकर, शेतकी अधिकारी सचिन बागल,  प्रसाद भोसले, कोजन मॅनेजर भरत नलगे , स्टोअर किपर कानिफनाथ गव्हाणे,  सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड , लेबर ऑफिसर भास्कर जंगले कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ लबडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कामगार उपस्थित होत. भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर दत्तात्रय खामकर यांनी आभार मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष