गोयेगाव ते आगोती दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By : Polticalface Team ,02-06-2024

गोयेगाव ते आगोती दरम्यान उजनी जलाशयात पूल करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी


प्रतिनिधी करमाळा

इंदापूर व करमाळा  तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 

आगोती (ता.इंदापूर )ते गोयेगाव (ता. करमाळा) दरम्यान नवीन पूलाची मंजुरी द्यावी व मंजूर असलेल्या कुगाव शिरसोडी पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे 

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गणेश कराड यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे. 


दिलेल्या निवेदनात कराड यांनी म्हटले आहे की करमाळा व इंदापूर तालु्यातील नागरीकांना हाकेच्या अंतरावरील असलेल्या गावात जाण्यासाठी  भिगवण टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्याच्या मार्गे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो.त्यामुळे पैसे व वेळेची बचत करण्यासाठी उजनी जलाशयातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी,डाळींब,ऊस व इतर फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा परिसर फृट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात कृषि पर्यटन, मासेमारी,साखर उद्योग, वनस्पती अभ्यास,नौकाविहार, जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी कुगाव ते शिरसोडी तसेच गोयेगाव (वाशिंबे )ते आगोती दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे.उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते आगोती नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सद्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे.आगोती ते गोयेगाव भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध आहेत.त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुकडुन तीनशे तीनशे मीटर पर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल. 


इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव(वाशिंबे)असा पूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार आहे.करमाळा तालुक्यातील पोफळज ते टाकळी दरम्यानचे सर्वांना दळणवळणासाठी सोईस्कर होणारें मध्यवर्ती असे गोयेगाव (वाशिंबे)हे ठिकाण आहे उजनी पाणलोट क्षेत्रात या पूलामुळे सकारात्मक परिणाम होणार आहे.या पूलासाठी पश्चिम भागातील बहुतांश ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे मागणी केली आहे


श्रीकांत साखरे 

सामाजिक कार्यकर्ते, राजुरी.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष