नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक तनपुरे यांची श्री व्यंकनाथ विद्यालयाला सदिच्छा भेट!

By : Polticalface Team ,08-06-2024

नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक तनपुरे यांची श्री व्यंकनाथ विद्यालयाला सदिच्छा भेट! लिंपणगाव (प्रतिनिधी)- चिलवडी तालुका कर्जत येथील नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांतीलाल तनपुरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय दळवी यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापक कांतीलाल तनपुरे यांनी विद्यालयाचा प्रशस्त परिसर; विविध वृक्ष लागवडीतून नटलेला सौंदर्यपूर्ण परिसर; विद्यालयाच्या प्रत्येक वर्ग खोली समोर भिंतीवर रंगकामाद्वारे विविध राष्ट्रीय नेत्यांचे बोलके तैल चित्र; सुसज्ज संगणक कक्ष; विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण बैठक व्यवस्था; विद्यालयाचे सौंदर्यपूर्ण वृक्ष लागवड; विद्यालयामार्फत विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत शिक्षक वर्गाकडून जादा तासांचे नियोजन; त्या परीक्षांमध्ये नेत्र दीपक गुण मिळवून चमकलेले विद्यार्थी; प्रत्येक वर्षी एसएससी व एच एस सी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल याबाबत मुख्याध्यापक श्री तनपुरे यांनी उपस्थित दरम्यान समाधान व्यक्त केले आहे. निश्चितच श्री व्यंकनाथ विद्यालय तालुक्यात एक आदर्श विद्यालय म्हणून कार्यरत असल्याचे गौरवगार श्री तनपुरे यांनी यावेळी काढले. सत्कारानंतर बोलताना मुख्याध्यापक श्री तनपुरे पुढे म्हणाले की; विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सस्ते यांनी दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यालयाचे प्रशासन सांभाळताना शालेय शिस्त व्यसनमुक्ती विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच धार्मिक क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. ते आणखी पुढे म्हणाले की; विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधताना विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे जादा तास; विद्यालयाचा स्थापनेपासून लागलेला इयत्ता दहावीचा उच्चाअंकी निकाल; शिक्षण संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. असे सांगून विद्यालयाची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशी प्रार्थना व्यंकनाथ महाराजांना करत मुख्याध्यापक तनपुरे यांनी विद्यालयाने जो सन्मान केला त्याबद्दल मुख्याध्यापक तनपुरे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संजय दळवी; जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; सेवानिवृत्त लिपिक पोपटराव राऊत; विद्यालयाचे कर्मचारी एकनाथ नेटवटे आदी यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी