पारगाव सुद्रिक येथे 29 वर्षांनी भेटले बाल सवंगडी

By : Polticalface Team ,10-06-2024

पारगाव सुद्रिक येथे 29 वर्षांनी भेटले बाल सवंगडी

लिंपणगाव प्रतिनिधी 


छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक या शाळेच्या 1994- 95 या बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या शाळेचे फाउंडर शिक्षक मुख्याध्यापक श्री देशमुख सर हे होते . गेट-टुगेदर च्या या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी म्हणजेच प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना बोलवून त्यांचे गुरुपूजन व मानसपूजा केली. त्यावेळी सर्व शिक्षक भारावून गेले.

      सर्व शिक्षकांना ट्रॉफी नारळ शाल देऊन सन्मानित करण्यात आले . 29 वर्षानंतर भेटलेले सर्व मित्र मैत्रिणी यावेळी अतिशय भावूक झालेले होते. सर्वांनी आपली संघर्षमय कहानी या ठिकाणी विशद केली .सर्व माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या सर्व मित्रांची सुखदुःखाची सर्व चौकशी केली .सर्वांना गेट-टुगेदर च्या एकत्र येण्यामुळे  खूपच आनंद झाला.

       यावेळी प्राथमिक शाळेचे धुमाळ गुरुजी, मखरे गुरुजी अल्हाटबाई , अल्हाट गुरुजी, खराडे गुरुजी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे शिक्षक पवार सर ,घोंडगे सर ,देशमुख सर , तोंडे सर, भापकर सर, बोडखे सर व दरेकर मॅडम यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व  अशोक आळेकर हेही उपस्थित होते.

        कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांशी गप्पा मारत अतिशय आनंदाने हा दिवस साजरा केला. तसेच आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो .त्यामुळे शाळेसाठी सर्व मित्रांकडून एक सुंदर असे कपाट भेट देण्यात आले.

      माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा व गुरुजन सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन आणि धनाने खूप खूप असे सहकार्य केले.


गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे प्रत्येकामध्ये एक ऊर्जा निर्मिती झाल्यासारखे वाटले. तसेच वर्षातून एकदा तरी आपण एकत्र यावे अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी