By : Polticalface Team ,14-06-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख 98 50 68 63 60
गट-तट बाजूला ठेऊन तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची ताकद द्या, रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करुन दाखवणार अशी खात्री माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पोथरे येथील सभेत बोलून दाखवली. जनसंवाद गावभेट दौऱ्यात आज पोथरे या ठिकाणी पाटील यांनी भेट दिली. यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ईश्वर वाळुंजकर हे होते तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे, सभापती अतूल पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल,
नामदेव शिंदे,संतोष वाळुंजकर,अंकुश शिंदे, दादा झिजाडे सर,बापू गोसावी,रेवन झिजाडे, नवनाथ झिजाडे, वामन पठाडे, हनुमंत शिंदे, विलास शिंदे, विलास साळुंखे, पंडित भांड, किसन शिंदे, प्रभाकर शिंदे, पाराजी शिंदे, संतोष ठोंबरे, दत्ता हिरडे, अशोक जाधव, छगन जाधव, शरद शिंदे, दीपक कडू,बाळासाहेब जाधव,धनंजय शिंदे,तात्यासाहेब गोफने, राजेंद्र झिजाडे, रणजित शिंदे, आबा नवनाथ शिंदे, आबा ठोंबरे, विष्णू खटके,रावसाहेब शिंदे, रावसाहेब पाटील, बबन शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की सन २०१४ ते १९ च्या पंचवार्षिक कालावधी मध्ये किती विकासकामे झाली आणि सन २०१९ ते २४ च्या पंचवार्षिक कालावधी मध्ये किती विकासकामे झाली याचा ताळेबंद आता जनता करत आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात शेतीसाठी वीज व पाण्याची मागणी वाढत चालली आहे. उजनी धरण उशाला असून आजही जवळपास एक लाख एकर क्षेत्र जिरायत म्हणून पावसावर अवलंबून आहे हि बाब चिंताजनक असुन हरितक्रांती करुन दाखवण्यासाठी मला सत्ता हवी असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
यावेळी पाटील यांनी पोथरे परिसरातील वाडी वस्तीना भेटी दिल्या. पोथरे ते पोटेगाव हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त असुन आमची दळणवळणाची गैरसोय होत असल्याची व्यथा नागरिकांनी बोलून दाखवली. माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी करत लोकांची व्यथा आणि वेदना जाणून घेतली. सहा बंघारे मंजूर असून येथे काम होत नाही. करमाळा तालुक्यातील प्रशासनावर कोणाचा वचक उरला नसल्याने अधिकारी उलट उत्तरे देऊन माघारी लावत आहेत. तसेच ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत असून आता न्याय कोणाजवळ मागायचा अशी व्यथा नागरिक यावेळी माजी आमदार पाटील यांच्या समोर व्यक्त करत होते. यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आपण स्वतः जातीने या सर्व समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सरपंच अंकुश शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर रावसाहेब शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. धनाजी शिंदे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष