छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड करणार रक्ताभिषेक आंदोलन.अरविंद कापसे व श्याम भाऊ जरे यांचा आयोजित पत्रकार परिषदेत इशारा

By : Polticalface Team ,14-06-2024

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड करणार रक्ताभिषेक आंदोलन.अरविंद कापसे व श्याम भाऊ जरे यांचा आयोजित पत्रकार परिषदेत इशारा

लिंपणगाव (प्रतिनिधी)---छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आम्ही मागील ५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. स्मारकासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने आणि पाठपुरावा यामुळे जवळपास दिड कोटी रुपये इतका निधी या कामसाठी मंजूर झाला असुन स्मारकासाठीचा प्रस्तावित सरकारी जागेत असलेले खाजगी अतिक्रमण काढण्यास महसुल प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन अतिक्रमण करणाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.

स्वराज्यधर्मासाठी आत्मबलिदान देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या स्मारकासाठी आज ३५० वर्षानंतर देखील लोक अडथळा निर्माण करत आहेत ही फार निंदनीय बाब आहे. आमचा स्वाभिमान असणारे संभाजी महाराज यांचे  बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन  स्मारक व राजेंचा अश्वारूढ पुतळा उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

छत्रपती संभाजी महाराज चौक हा श्रीगोंदा शहरातील प्रमुख चौक असून बहादुरगडाकडे जाणारा रस्ता देखील याच चौकातून जातो. हजारो तरुण मुले मुली याचं चौकातून दारतोज शाळा कॉलेजसाठी प्रवास करत असतात. या मुलांना समोर भव्य छ्त्रपति संभाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणा देत राहिल व येणाऱ्या पिढीला संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख होईल म्हणून आम्ही स्मारकासाठी आग्रही आहोत.

प्रशासनाने लवकरात लवकर सदर जागेवरील अतिक्रमण हटवले नाही तर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमचे आंगठे कापून रक्ताचा अभिषेक घालणार आहोत. ज्या राज्याने स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचे पाट वाहिले त्या राज्याच्या स्मारकासाठी तमाम शंभुप्रेमींनी आंदोलनात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे. असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.


आयुष्यातील तरुणपणातील ५ वर्ष स्मारकासाठी आम्ही संघर्ष करण्यात घातली आहेत. आता आर पार ची लढाई आहे. आमच्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही रक्ताभिषेक घालून छत्रपती संभाजी राजेंना मानवंदना देणार आहोत.

   अरविंद विट्टलराव कापसे

   जिल्हाध्यक्ष - संभाजी ब्रिगेड


आमचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक श्रीगोंदा शहरात उभे राहणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब असून स्मारक उभे करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. तरुणाईला दिशा देणार छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात बाधा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करून प्रशासन तमाम शिव शंभु प्रेमींच्या भावना दुखावत आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची किंमत प्रशासननाला मोजावी लागेल. 

    इंजि. शामभाऊ राम जरे 

   तालुकाध्यक्ष - संभाजी ब्रिगेड



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.