By : Polticalface Team ,15-06-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहराचे सुपुत्र धनंजय देवडीकर यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्दल आज सावंत गटाच्या वतीने नगरसेवक संजय सावंत यांच्या शुभहस्ते सावंत कार्यालयात फेटा हार नारळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत माजी नगरसेवक फारुक जमादार माजी नगरसेवक दिपक सुपेकर जमील काझी मार्तंड सुरवसे शिवाजी वीर संभाजी गायकवाड नागेश उबाळे बापू उबाळे यादव आदी जण उपस्थित होते
देवडीकर हे गेली तेरा वर्षापासून मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत होते त्यांचे काम करण्याची पध्दत तसेच त्यांनी
अनेक गुन्हे चा तपास लावला आज त्यांची पदोन्नती होऊन पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे
यावेळी सत्काराला उत्तर देताना देवडीकर म्हणाले की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथ पर्यंत पोहोचलो आहे यापुढेही असेच काम करुन करमाळा शहराचे नाव लौकीक करेन असे ते यावेळी म्हणाले
वाचक क्रमांक :