By : Polticalface Team ,15-06-2024
दौंड तालुक्यातील उपस्थित जमलेल्या नागरिकांनमध्ये कुजबुज सुरु होती दौंड तालुक्यातील दक्षिण भागात पाण्या वाचून नेहमीच दुष्काळाचे सावट दिसत आहे. बारामती चा विकास झाला त्या प्रमाणे दौंड तालुक्याचा विकास कधी होणार आहे ? या भागात उद्योगिक कंपन्या निर्माण झाल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. कुरकुंभ येथील केमिकल कंपन्या मुळे. दुष्परिणाम दिसू लागले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अवैध व्यवसाय माफियांची नजर केमिकल कंपन्याकडे लागली आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमातून हे स्पष्ट झाले आहे. या भागात उद्योगिक कंपन्या निर्माण झाल्यास स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल बेरोजगारीला आळा बसेल. अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा असुन. लेबर ठेकेदार मलीदा खाऊन मनमाणी करीत असल्याची तालुक्यात चर्चा होत आहे.
दौंड विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव दोरगे पाटिल. व उपाध्यक्ष सोमनाथ सोडनवर यांनी मा शरदचंद्र पवार साहेब यांना विविध विषयांचे निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने दौंड तालुक्यातील विविध कृषि विषयक व दुष्काळ सदृश्य तसेच शेतकरी संपूर्ण शेती कर्ज माफी मिळण्या बाबत तसेच दौंड तालुक्यातील महिलांना व तरुणांना स्थानिक विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळणे बाबत. मा शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.दौंड तालुक्यातील दक्षिण बाजूला असलेल्या मौजे खोर. देऊळगाव गाडा. कुसेगाव. पडवी. वासुंदे रोटी या भागातील शेतकऱ्यांच्या जिरायती जमीनी असलेल्याने नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. दौंड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जानाई-शिरसाई उपसा सिंचनाच्या माध्यमातून खोर, पडवी व इतर गावातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणेसाठी योग्य ते उपाय नियोजन कराव्यात. दौंड तालुक्यात प्रशस्त असे कृषि महाविद्यालय होणे. दौंड तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील माती व पाणी परिक्षण शासकीय केंद्र. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला, बोरीपार्धी, यवत अशा मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास शेतकऱ्यांना सोईस्कर होईल.
दौंड तालुक्यातील नोकरदार, व्यापारी, शेतकरी, कामगार तसेच सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याची दैनंदिन प्रवास कामी ठरणारी डेमो लोणावळा-पुणे लोकल ही दौंड रेल्वे स्टेशन पर्यंत सुरु करणे. दौंड तालुक्यातील वरदान ठरणारी पुरंदर उपसा खुपटेवाडी योजनेची जी पाईप लाईन आहे. ती इतर गावा पर्यंत पोचावी. डाळींब, बोरऐंदी, भरतगाव, यवत, भांडगाव, वाखारी या गावांना सदर पाईप लाईन मध्ये बदलाव करुन ती सद्यस्थितीत ज्या फुट मध्ये आहे त्यामध्ये बदल करुन चार फुटी व पाच फुटी पाईप नव्याने टाकून वरील नमुद गावांतील असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा. खडकवासला धरणामधून कॅनॉल मार्फत येणाऱ्या पाण्याचा कासुर्डी गावातील तलावामध्ये हे पाणी सोडावे. सदर कॅनॉल व तलाव यामधिल अंतर १ कि.मी.च्या आतील असुन. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी ओढा, नाल्यातून वाहुन जाणारे पाणी आडवून गावातील तलावात सोडण्यात यावे. जेणे करून त्याचा लाभ परिसरातील संबंधित कासुर्डी, खामगाव, यवत, भरतगाव व इतर गावातील शेतकऱ्यांची शेती ओलीताखाली आणणे कामी सोईस्कर ठरेल.दौंड- पुरंदर तालुक्याला जोडणारा भांडगाव-पोंडे सिमेवर रस्ता डांबरीकरण करुन त्यात सुधारणा होणे बाबत. अशा महत्त्वाच्या विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांचे लक्ष वेधले होते. सदर मागणीचे निवेदन त्यांनी स्वीकारले आहे. या प्रसंगी दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी वर्गानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली .
वाचक क्रमांक :