दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉलमध्ये वर्षभर पाणी राहील असे नियोजन करणार माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे गाव भेट दरम्यान सरपडोह येथे आश्वासन

By : Polticalface Team ,17-06-2024

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉलमध्ये वर्षभर पाणी राहील असे नियोजन करणार माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे गाव भेट दरम्यान सरपडोह येथे आश्वासन करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनाल मध्ये वर्षभर पाणी राहिल असे नियोजन करणार असल्याचे ठाम आश्वासन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. सरफडोह येथील सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आज सरफडोह येथे गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आयोजित बैठकीस सरपंच पांडूरंग वाळके,सभापती अतूल पाटील, माजी सरपंच कांतीलाल घोगरे, माजी सरपंच दादा पाटील, सोसायटी सदस्य सुभाष पवार, माजी सरपंच महादेव नलावडे, रामभाऊ बोंद्रे, श्रीरंग गवारे, नाथराव रंदवे, रामदास पवार, रामभाऊ मोरे, मारुती यादव, पोलीस पाटील अंकुश खरात, मनोहर रंदवे, जगन्नाथ गायकवाड, भानुदास शिंदे, सचीन मस्कर, स्वीय सहाय्यक सुर्यकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या हक्काचे १.८० टि एम सी पाणी या चार वर्षात एकाही वर्षी उचलले गेले नाही. तर दहिगाव येथील सहा पंप आणि कुंभेज येथील चार पंप असे सर्व पंप एकाच वेळी चालवताना पहायला मिळाले नाही. यामुळे पुर्वभागाचे हक्काचे पाणी उजनीत शिल्लक राहिले. यामुळे मग इतर आमदारांनी अगदी अक्कलकोट पर्यंत उजनीचे पाणी पळवून नेले. सन २०२४ मध्ये जनतेने संधी द्यावी, एकदाही तुम्हाला मुख्य कॅनाल रिकामा दिसणार नाही. वर्षभर दहिगाव उपसाचे पाणी या चारीत दिसेल. चार चार महिन्याची आवर्तने सलगपणे चालू ठेवण्याची धमक फक्त नारायण पाटील यांच्या मध्येच आहे हे मी कृतीतून सिद्ध करुन दाखवेन. यामुळे पुर्वभागातील शेतकऱ्यांनी सत्तांतर करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. नाथराव रंदवे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच पांडुरंग वाळके यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष