दौड रेल्वे पोलिस स्टेशन परिसरातील अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करा ?. नागरिकांची मागणी. मोटर सायकल चोरट्यांचे प्रमाण वाढले.
By : Polticalface Team ,19-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १९ जून २०२४. दौंड शहरातील रेल्वे पोलिस स्टेशन जवळून अज्ञात चोरट्यांने. एम एच 42 AC 1372. हिरो कंपनीची मोटर सायकल अज्ञात चोरट्यांने दबा धरून पळवली असल्याची घटना दि,12 जून रोजी भर दिवसा घडली आहे. दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याचे बोलले जात आहे. दौंड रेल्वे पोलीस स्टेशन जवळ हे चोरीचे प्रकार अनेक दिवसांपासून घडत आहेत. हिच मोठी शोकांतिका असल्याची दौंड मध्ये चर्चा होत आहे. दौंड रेल्वे जंक्शन परिसरात यापूर्वी अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याचे बोलले जात असुन. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चोरट्यांन पासून सुरक्षा राम भरोसे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दौंड रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी वाहन चोरीचे प्रकार सतत घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनमध्ये चर्चा होत असुन. अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
फिर्यादी शरद विठ्ठल सरोदे.रा पानसरे हॉस्पिटल जवळ लिंगाळी रोड ता दौंड जिल्हा पुणे. यांनी हीरो कंपनी ग्लॅमर एम एच 42 AC 1372. ही लाल रंगाची मोटर सायकल सन २०१३ साली 78 हजार रुपयाची घेतली होती.
ती दौंड रेल्वे पोलिस स्टेशन जवळ पार्क करून पुणे येथे नोकरी करीत असल्याने रेल्वेने आप डाऊन करीत असे रेल्वे पोलिस स्टेशन जवळ पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरट्याने दबा धरून चोरुन नेली असल्याने त्यांनी दोन दिवसांपासून दौंड रेल्वे स्टेशन शहर व परिसरात मोटर सायकलचा शोध घेतला. मात्र अद्याप तपास लागत नसल्याने दि 14 जून रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या बाबत अधिक माहिती अशी की
दि.12/06/2024 रोजी सकाळी 6.15 वा.जे. सुमारास दौड रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या दौंड रेल्वे पोलिस स्टेशन शेजारी सकाळी 6.30 वाजता सदर मोटर सायकल M H.42 AC 1372 ही पार्क करून फिर्यादी नेहमी प्रमाणे कामावर निघून गेले. मात्र सायंकाळी 6.00 वाजता कामावरून परत गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता सदर हिरो कंपनीची ग्लॉमर मोटर सायकल नं MH 42 AC 1372 हि मिळून आली नाही. या बाबत फिर्यादी यांची खात्री झाली की.
सदर मोटर सायकल कोणी तरी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली असल्याने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले असून दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :