By : Polticalface Team ,20-06-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत आणि कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून योग्य तो समनव्य ठेवून आवश्यक ती काळजी घेत वेळेत कामे करण्यावर भर द्या. एक महिन्यानंतर मी सर्व विभागांचा आढावा घेईल त्यावेळेस मला कामांमध्ये सुधारणा दिसली पाहिजे अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावर्षी पाऊस चांगला पडला असून शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबरच शेती व इतर उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सर्व बँकांनी सहकार्याची भावना ठेवा, अशी सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.
आमदार शिंदे यांनी काल मंगळवारी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागातील प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री. गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक श्री. चंदनशिवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामनदादा बदे ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले आदी उपस्थित होते.
तहसीलदार ठोकडे यांनी करमाळा तालुक्यात कुणबी दाखले वितरणात वेगाने काम सुरु असल्याचे सांगितले. याशिवाय रस्ता केसची प्रकरणी निकाली लावली असून सध्या पावसामुळे स्थळ पहाणी करण्यात अडचणी येत आहेत. मात्र अशाही स्थितीत कोणाचीही अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे सांगितले. तालुक्यातील घरकुलासाठी यादी मिळाल्यानंतर जप्त केलेली वाळू उपलब्ध करून दिली जाईल, असेही तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे.
गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, करमाळा तालुक्यात घरकुलाचे कामे वेगाने सुरु आहेत. पाणी नसल्यामुळे काही ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी अडचण होती. सध्या रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. घरकुल बांधकामासाठी ‘डस’हा वाळूला पर्याय आहे. मात्र वाळूसाठी महसूल विभागाकडे लाभार्थ्यांची यादी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्याशी संबंधित विभागाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड यांनी त्यांच्या विभागाकडून सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी अधिकारी वाकडे म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. आणखी जादा पाऊस झाला तर पेरणीची पद्धत बदलेले. पीक बदल करण्यावर भर दिला जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जादा दराने खत व बियाणे विक्रीची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. मात्र ‘एमआरपी’च्या पुढे विक्री होत नसेल तर त्यात कारवाई करता येत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ‘उमेद’चे जगताप यांनीही तालुक्यातील बचत गटाची स्थिती सांगितले. गावागावात कार्यरत असलेल्या ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकध्यक्ष संतोष वारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, भोसे येथील भोजराज सुरवसे, श्री. जगदाळे आदींनी यावेळी समस्या मांडल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष