By : Polticalface Team ,20-06-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०२३ योजनेतून तूर ,उडीद व मुग तसेच कांदा या पिकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एक निवेदन पाठवण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०२३ योजनेतून तूर , उडीद मुग व कांदा या पिकांना विमा कंपनीकडून वगळण्यात आले आहे. माझे करमाळा मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये तूर , उडीद व मुग, कांदा, आदी पिकांची विक्रमी लागवड केली होती. तसेच विमा कंपनीकडे याचा विमा ही उतरविला होता. परंतु आता विमा कंपनीकडून २५ % अग्रिम नुकसान भरपाई देण्याचे ठरले. यात विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीन या पिकाचा समावेश केला. तूर , उडीद व मुग ही पिके वगळण्यात आली. करमाळा तालूक्याती ५९५९ शेतकऱ्यांना ८६,२४०००/- एवढीच रक्कम विमा नुकसान भरपाई पोटी मंजूर झालेली आहे. करमाळा तालुक्यामध्ये तूर , उडीद व मुग या पिकांचीच विक्रमी लागवड होते.तरी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी तूर , उडीद व मुग, कांदा या पिकानाही विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सदर पिक विमा कंपनीला दिले पाहिजेत. दि १४ जुन २०२४ रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी सोलापूर जिल्ह्यातील लागवड क्षेत्र, पिके, पिक विमा नुकसान भरपाई रक्कम यांची आकडेवारी प्रसिध्दी माध्यमांना दिली. यात केवळ मका, बाजरी आणि सोयाबीन या तीन पिकांचा उल्लेख असल्याने करमाळा मतदार संघातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. जर पिक विमा रक्कम भरुनही आपल्या पेर आणि नुकसान झालेल्या पिकास नुकसान भरपाई यादीतून वगळले गेले असल्याचा धसका शेतकऱ्यांना बसला असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी करमाळा मतदार संघातील तपशीलवार माहिती संबंधित विभागाकडून घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष