साथीच्या रोगांवर उपाययोजना व संरक्षण करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मंगलदास निकाळजे

By : Polticalface Team ,13-07-2024

साथीच्या रोगांवर उपाययोजना व संरक्षण करून  भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - मंगलदास निकाळजे

बारामती प्रतिनिधी 

भिमसेन जाधव

बातम्या व जाहिरातीसाठी

मो *9112131616*  बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक दिवसांपासून नागरीक आजारी पडत आहेत अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत या रुग्णांमध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हिवताप, गोचीड ताप, संसर्गजन्य रोग,  अशा प्रकारच्या साथीचे रोग रुग्णांमध्ये आढळत आहेत बारामती शहरांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्यामुळे या रोगांचे देखील प्रमाण वाढत चालले आहे मुख्यतः दलित वस्त्यांच्या अवस्था बिकट आहे दलित वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे दलित वस्त्यांमधील अस्वच्छतेमुळे या ठिकाणी मच्छरांचे प्रमाण जास्त आहे संडासाची अवस्था अस्वच्छ असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे यामुळे अनेक नागरिकांना संसर्ग होऊन नागरिक व लहान लहान मुले गंभीर प्रमाणात आजारी पडत आहेत या वस्त्यांमध्ये असणारी गटारी सातत्याने तुंबत असल्यामुळे गटारीतील अस्वच्छ पाणी बाहेर येऊन नागरिकांच्या दारात तसेच घरामध्ये शिरत असते आणि याच गटारीच्या पाण्यामध्ये लहान लहान मुलं खेळून आजारी पडत असतात तसेच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना देखील गंभीर स्वरूपाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सतत बदल होत असल्याने कधी पाणी गढूळ येत आहे तर कधी पाण्याचा वास येत आहे, आणि पाणी भरून हंड्यात दोन दिवस न हलवता ठेवले की त्याच्यामध्ये खाली शारचा गाळ साचत आहे आणि त्यामुळे किडनी स्टोन (मुतखडा), पोटाचे विकार, आतड्यांवर सूज येणे अशाप्रकारचे अनेक रोग निर्माण होऊन नागरिक आजारी पडत आहेत याचा गंभीरपूर्वक विचार करून बारामती शहरावर साथीच्या रोगांचे खूप मोठ्या प्रमाणात संकट येण्याआधी सर्व प्रकारच्या साथीच्या रोगांपासून संरक्षणाच्या उपाययोजना युद्ध पातळीवर  करावे यामध्ये धूर फवारणी, जंतुनाशक फवारणी, सर्व ठिकाणी स्वच्छता करणे, विशेष दलित वस्त्यांची  स्वच्छता करणे, जंतुनाशक पावडर फवारणी करणे, संडासाची वेळेवर स्वच्छता करणे, संडासा मधल्या पाण्यामध्ये जंतुनाशक पावडर टाकणे, संडासची वारंवार तपासणी करणे, संडास मधून दुर्गंध येणार नाही यावर उपाययोजना करणे, व इतर प्रकारच्या उपायोजना करून नागरिकांना साथीच्या रोगापासून वाचवने व जनजागृती करणे, नागरिकांवर मोफत उपचार करणे, 

  तसेच नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करून सतत पाण्यात बदल होणार नाही, पाण्याचा वास येणार नाही, नागरिकांना शारयुक्त पाणी पाजले जाणार नाही  याची दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना राबवण्याबाबत सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना सूचित करून तसे आदेश काढावेत, व नागरिकांना  स्वच्छ पाणी पुरवावे कारण पाण्यापासून सर्वात जास्त आजार होतात या साठी पाण्यावरती जास्त काम करून नागरिकांना पिण्याचे पाणी स्वच्छ पुरवले जावे 

  तसेच बारामती शहरात खूप मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे ही कुत्री मोठ्या संख्येने गोळा होऊन नागरिकांच्या अंगावर जातात व नागरिकांना चावा घेतात लहान लहान मुलांना देखील चावा घेतात ही भटकी कुत्रे असल्याने त्याचे इन्फेक्शन होऊन नागरिकांना रॅबिट सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना त्वरित पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास भाऊ निकाळजे यांनी केली 

   या मागण्यांवर येत्या सात दिवसात उपायोजना मोठ्या झपाट्याने राबवल्या नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा पवित्रा घेऊन आगळे वेगळे स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती निकाळजे यांनी दिली यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुका अध्यक्ष अनुप मोरे, शहर सचिव विनय दामोदरे, कार्तिक भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.