दौंड मध्ये बिल्डर याच्यावर ॲट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करा - सुनील व्हंकाडे
By : Polticalface Team ,15-07-2024
दौंड (प्रतिनिधी) दौंड शहरातील बिल्डर दत्तात्रेय दौंडकर व त्याचा भाऊ महेंद्र दौंडकर, त्याची आई हौसाबाई दौंडकर वडील महादेव दौंडकर यांनी मला विश्वासात घेऊन माझी प्रॉपर्टी सर्वांनी संगनमताने लुटली आहे, त्यांना वेळोवेळी अनेक मान्यवरांच्या मध्यस्थीने माजी प्रॉपर्टी मला परत करा अशा पद्धतीने निरोप दिले परंतु, त्याची कोणतीही परिस्थितीत मला माझी प्रॉपर्टी परत द्यायची नाही अशा प्रकारचे वर्तन त्याचा दिसून येत आहे, याबाबत वेळोवेळी त्यांना प्रत्यक्ष भेटला असता त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली आहे याच्या फसवणुकीमुळे माझी आर्थिक तसेच घरगुती परिस्थिती पूर्ण बिघडलेली आहे त्यामुळे माझे काही बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी संबंधित कुटुंब आहे जबाबदार राहील, प्रशासनाने संबंधितावर ॲट्रॉसिटीसह जीवे मारणे धमकी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी उपोषण कर्ता सुनील व यांनी दौंड तहसीलदार दौंड पोलीस स्टेशन पुणे जिल्हा अधिकारी ,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केलेली आहे, आज दिनांक १५जुलै २०२४ पासून दौंड तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केलेले आहे
वाचक क्रमांक :