तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत व्यंकनाथ विद्यालयाच्या मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला
By : Polticalface Team ,15-07-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी )ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी कोलंदर येथील श्री वसंत दादा पाटील विद्यालयात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट (मुली) श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ या शाळेतील विद्यार्थिनींनी द्वितीय पारितोषिक पटकावले. या तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातील विविध सहा शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये व्यंकनाथ विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्टपणे बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थिनींचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर आबा काकडे; स्कूल कमिटीचे सर्व विश्वस्त मंडळ; प्राचार्य आनंदा पुराने सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :