By : Polticalface Team ,16-07-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 महाराष्ट्र प्रदेश राज्य महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र सचिव पदी जेऊर तालुका करमाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अँड.शहानुर अहमद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे सदरची निवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अँड रोहिणी एकनाथराव खडसे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे
पक्ष बळकटीसाठी मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी सदरची निवड करण्यात आल्याचे निवड पत्रात म्हटले आहे एडवोकेट शहानुर सय्यद यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला सचिव पदी निवड झाल्याने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे
सोलापूर जिल्ह्यातील विशेषता करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका ग्रामीण भागातून एडवोकेट शहानुर सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला राज्य सचिव पदी काम करण्याची अल्पसंख्यांक वर्गामधून तसेच करमाळा तालुक्यातून प्रथमताच संधी मिळाल्याने त्यांचे विशेषता सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे
आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा सौ रोहिणी ताई खडसे यांच्या मार्गदर्शनातूनच मी पक्षाची ध्येय धोरणे संपूर्ण राज्यात पोहोचविणार असल्याची माहिती पक्षाच्या नवनिर्वाचित महिला राज्य सचिव अँड शहानुर सय्यद यांनी पत्रकारांना बोलताना बोलताना दिली
वाचक क्रमांक :