लिंपणगाव( प्रतिनिधी )-आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून दिंडी सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा 16 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी व शिक्षकांनी पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत. या पालखीचे श्री व्यंकनाथ मंदिरात आगमन झाल्यानंतर सदर मंदिरात श्री हंगेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांची कन्या ह भ प संचिता धायगुडे हिचे प्रवचन आयोजित करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रवचनरुपी सेवेत ह भ प संचिता धायगुडे यांनी धार्मिक दृष्ट्या भरीव मार्गदर्शन करत संत नामदेव महाराजांचा अभंगाचा आधार घेत म्हटले आहे की; संत नामदेव महाराजांचा अधिकार सांगताना त्या म्हणाल्या की; संत नामदेव महाराजांनी कपड्यांचा व्यापार करताना एका दगडाला साक्षी मानून कपडे दिले. व साक्षीदार म्हणून तो दगड आपल्या घरी घेऊन गेले व त्या दगडाला म्हणाले हे गणोबा आमच्या कापडाचे पैसे द्या; काय? आश्चर्य दगडच सोन्याचा झाला. संत नामदेव महाराजांनी लोटांगण घालतात आणि म्हणतात हे देवा मी तुझे चरण वंदिन डोळ्याने तुझे रूप पाहिलं. असे उद्भवतीत करत त्यांनी उपस्थित विद्यार्थी मान्यवर व ग्रामस्थांना सल्ला देत म्हणाल्या की सर्वांनी पांडुरंगावर नितांत विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सतत मुखातून भगवंताचे प्रत्येकाने नामस्मरण करावे निश्चितच ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणीचे रूप धारण करत मोठा सहभाग घेतला. या दिंडी सोहळ्यामुळे लोणी व्यंकनाथ मध्ये पंढरीचे स्वरूप दिसून आले. या दिंडी सोहळ्यानंतर विद्यालयाने देखील विद्यार्थ्यांना गोड महाप्रसादाचे वाटप केले या प्रवचन रुपी सोहळ्यास राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा; गावच्या सरपंच मनीषाताई नहाटा; नागवडे कारखान्याचे माजी संचालक विलासराव काकडे; माजी सभापती गणपतराव काकडे; स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव लगड; सामाजिक कार्यकर्ते श्री नलगे तात्या; प्राचार्य आनंदा पुराने सर यांच्यासह विद्यार्थी; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.