नागवडे इंग्लिश मीडियम ची बालदिंडी उत्साहात संपन्नबाल वारकऱ्यांनी केली संतांची वेशभूषा l दुमदुमला हरिनामाचा गजर
By : Polticalface Team ,16-07-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :
पाऊले चालती पंढरीची वाट...श्रीगोंदा ही संतांची भूमी समजली जाते. या भूमीतील श्री संत शेख महंमद महाराज यांना देशातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जाते. आषाढी एकादशीचे औचित्य साधत "नागवडे इंग्लिश मीडियम" च्या बाल वारकऱ्यांनी "माऊली माऊली माऊली" च्या नाम घोषात शेख महंमद महाराजांच्या प्रांगणामध्ये दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा केला.
प्रसंगी बाल वारकऱ्यांनी भारुड सादर करून भारतीय रुढी आणि परंपरा यांचे महत्त्व तसेच त्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण उपस्थितांच्या लक्षात आणून देत नैतिकतेचा संदेश या निमित्ताने दिला.तसेच खास महाराष्ट्रीयन कला अशी ओळख असलेल्या पावली, झांज आणि लेझीम पथकांनी कार्यक्रमात रंग भरला. तर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम होते. यावेळी श्री निकम यांच्यासह ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगरसेविका गयाताई सुपेकर, कुंदन धालवडे, पाथरे साहेब, सुरेखा ताई लकडे, पूनम ताई फिरोदिया यांच्यासह महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रशासन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. "आषाढी वारी" ही महाराष्ट्राची एक ओळख, परंपरा आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचे असणारे महत्त्व, त्यांनी केलेला त्याग विद्यार्थ्यांचा बालमनांवर बिंबवावा यासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वारी, दिंडी साजरी करत असल्याचे निरीक्षक एस.पी. गोलांडे यांनी सांगितले.
"विद्यालयाची बाल दिंडी शेख महंमद महाराज मंदिराकडे मार्गस्थ होत असताना श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रशांत उबाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले."
दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका नागवडे यांनी केले.तर प्रमुख पाहुणे व मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला पालकांचे निरीक्षक श्री.गोलांडे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी