तालुक्यात ठिकठिकाणी बरसल्या जोरदार आषाढ सरी; बळीराजा सुखावला..!

By : Polticalface Team ,16-07-2024

तालुक्यात ठिकठिकाणी बरसल्या जोरदार आषाढ सरी; बळीराजा सुखावला..!

श्रीगोंदा, दि. १६ जुलै २०२४ : काल सायंकाळी तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे वेळेवर पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. त्याचप्रमाणे कोळगाव येथे जोरदार आषाढ सरींनी हजेरी लावल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या मूग, बाजरी, तुर, कपाशी, हुलगे ,मटकी अशा खरीप पिकांना होणार आहे. आज दुपारी साडेचार वाजता सायंकाळच्या सुमारास आकाश काळे ढगांनी आच्छादले गेले आणि जोरदार सरिंनी पावसास सुरुवात झाली. सुमारे एक तास झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. शाळा सुटण्याच्या सुमारास पाऊस पडल्याने विद्यार्थी व पालक यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. अनेक विद्यार्थ्यांना पावसात भिजतच घरी जावे लागले. परंतु या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. या आषाढ सरींचा फायदा मूग, बाजरी, तूर, मटकी, हुलगे, कापूस, कांदा अशा खरीप पिकांना होणार असल्याने शेतकरी आनंदाला आहे. यंदाच्या वर्षी कोळगाव परिसरात सर्वच नक्षत्रांमध्ये वेळेवर पाऊस पडल्याने आतापर्यंत तरी शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. सतत पाऊस पडत असल्याने शेतामध्ये बांधावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. लव्हाळे माजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तणनाशक फवारणी, पिकांना खते देणे अशी लगबगीने कामे चालू आहेत. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचाराचा 7 नोव्हेंबर रोजी शुभारंभ

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या शुभहस्ते ७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडेंच्या प्रचाराचा शुभारंभ

जन आशीर्वाद यात्रेतून सौ अनुराधाताई नागवडेंना गावोगावी उदंड प्रतिसाद

लोणी व्यंकनाथ मध्ये बिबट्याचा धुमाकूळ कायम दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक कुत्र्यांचा बळी, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प

शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का.

शिंदेवाडी येथील युवक कार्यकर्त्यांचा. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. राजाभाऊ तांबे यांना जोरदार धक्का.