By : Polticalface Team ,16-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)--श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे धडे गिरवून प्रत्यक्ष मतदान करून विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडले.
या प्रतिकात्मक निवडणुकीत अर्ज भरणे अर्ज माघार घेणे अर्जाची छाननी मतदान करणे निकालाबरोबर आचारसंहितेचा कालावधी निवडणुकीचा प्रचार यासारख्या बाबी लहान लहान मुलांनी हुबेहूब नक्कल करून आदर्श लोकशाहीचा समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. विद्यार्थी उमेदवारांना वटवृक्ष, पुस्तक, पेन ,स्कूल बॅग ,शाळा इमारत ,अशी चिन्हे शाळेतील शिक्षकांच्या निवडणूक आयोगाने दिले. तेव्हा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांचा चिन्हा द्वारे प्रचार केला शालेय वर्ग मंत्री मंडळ निवडणुकीचे संपूर्ण नियोजन विभाग प्रमुख श्री. प्रणव नलगे सर यांनी केले.निवडणूक आयोग अधिकारी म्हणून मुख्याध्यापक श्री. हौसराव दांगडे साहेब व पर्यवेक्षक श्री.विलास भाऊ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी म्हणून श्री.शेळके आर. टी.,श्री. काळुखे वैभव व सौ.मीनाक्षी कदम , श्रीम.लक्ष्मी बोलणे यांनी काम पाहिले तर आर्मी ड्रेस परिधान करून विद्यार्थ्यांना रांगेत मतदानाकरिता मतदान केंद्रात पाठविण्याचे काम शंकर यदलोड सर यांनी केले.
केंद्र अध्यक्ष वर्ग शिक्षक आणि मतदान अधिकारी म्हणून वर्गातीलच मुलांनी मतदानाची कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली यानंतर दोन दिवसानंतर निकालाची मोजणी करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना मध्ये खेतमाळीस चैतन्य सदानंद व विद्यार्थिनीं उमेदवार मध्ये कु.पानसरे गौरी हिची निवड झाली. यावेळी विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. रामदास पवार ,अरुण पवार,संतोष भोईटे ,अंकुश कोकाटे, भगवान दिघे ,अर्चना कोरडे, सुमती सुरसे , महादेवी माने ,बाबासाहेब शिरोळे यांनी परिश्रम घेतले.यावेळी नागवडे कारखाना संचालक श्री.सुभाष काका शिंदे ,रवींद्र महाडिक ,विजय उंडे,उपसरपंच राहुल साळवे,बापूसाहेब वाबळे,सचिन उंडे ,अमोल गाढवे उपस्थित होते
वाचक क्रमांक :