आषाढी एकादशीनिमित्त लिंपणगाव येथे पालखी सोहळा उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,18-07-2024

आषाढी एकादशीनिमित्त लिंपणगाव येथे पालखी सोहळा उत्साहात साजरा

लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील पुरातन कालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून या देवताची पालखीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढत गावातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनाचा लाभ  अबाल वृद्धांना मिळाला. दरम्यान लिंपणगाव येथे सालाबाद प्रमाणे जवळपास 70 ते 75 वर्षापासून दिवंगत ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांच्या अथक प्रयत्नातून पारंपारिक पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची गावातून पालखी द्वारे वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आजही ग्रामस्थ व भजनी मंडळाने कायम ठेवली आहे. चालू वर्षी देखील आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाच्या गजरामध्ये वाजत गाजत भजनी मंडळाच्या अभंगवणीतून भक्तिमय वातावरणात गावातील ग्रामस्थांनी भव्य असे पालखी सोहळ्याचे आयोजन केले. 


        प्रामुख्याने या पालखी सोहळ्यामध्ये गावातील अबाल वृद्धांनी मोठा सहभाग नोंदवला. या पालखी सोहळ्यामुळे लिंपणगावमध्ये प्रति पंढरपूरचे स्वरूप दिसून आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कांबळे कुटुंब ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांचे पुत्र सुदामराव कुरुमकर; ग्रामपंचायत माजी सदस्य जालिंदर कुरुमकर; बबनराव भगत; बबन बडवे; बाळासाहेब रेवगे अमोल खळदकर; दत्तात्रेय कांगळे; चंद्रकांत भोईटे; केशव भोईटे; सतीश काशिनाथ भगत; सीताराम वाल्हेकर आदींनी हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या पालखी सोहळ्यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. महारतीनंतर पालखी सोहळ्याचे पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसर्जन करण्यात आले.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी