अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडला

By : Polticalface Team ,21-07-2024

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडला

    लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट या नादुरुस्त रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वादग्रस्त ठरलेल्या या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचलकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत येत असल्याने वाहनचालक; सभासद; ऊस उत्पादक; ग्रामस्थ आदींनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता जवळपास अडीच किलोमीटर अंतराचा  अनेक वर्षापासून खड्डेमय बनला गेला होता. या रस्त्यातून मार्ग सोडताना अनेक छोटे-मोठे अपघाताला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यामध्ये जागोजागी खडी उघडी पडून रस्त्याच्या मध्यभागी अक्षरशा दीड ते दोन फूट खोल खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी वाहन चालवताना या रस्त्यातून कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून साखर कारखान्याच्या गाळप हंगामात ऊस गाळपासाठी वाहतूक करणारी छोटी मोठी वाहने अक्षरशा जीव मोठे धरूनच वाहने चालवताना दिसून आली. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूने काटेरी झाडाची कुंपणे त्यामुळे रात्री अपरात्री देखील या रस्त्यातून वाहन चालवताना मोठ्या अपघाती प्रसंगाला सर्वांनाच तोंड द्यावे लागले. या प्रश्नासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये या महत्त्वाच्या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात सडेतोड लिखाण करण्यात आले. परंतु या रस्त्याचा प्रश्न आहे तसाच राहिला होता. 


        मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे समाविष्ट करण्यात आला होता. परंतु या  बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तुटपुंजा निधी उपलब्ध होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती होणे कामी अडचणीचे होत गेले. या कामे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा करून वेळोवेळी वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. पत्रकार कुरुमकर यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपाभियंता यांना आपणाकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली. 


      त्यानुसार संबंधित जिल्हा परिषद च्या उप अभियंता यांनी तात्काळ सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आणि काही दिवसानंतर तात्काळ हा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सामाविष्ट करण्यात आला. आता या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने  सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील तात्काळ या नादुरुस्त रस्त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन या अडीच किलोमीटर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता या रस्त्याचे कामही दोन दिवसापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रवासी वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला दोन्ही बाजूंनी मोजमाप करून सुलभपणे साईड पट्ट्या द्वारे रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे; त्याबरोबरच दोन्हीही रस्त्याच्या बाजूने जेसीबीच्या साह्याने चर काढून पावसाचे वाहणारे पाणी रस्त्यावर न येता सदर रस्त्याची लांबी रुंदी संबंधित ठेकेदाराला द्यावी; त्यानुसार रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे ही अपेक्षा ग्रामस्थ प्रवासी व वाहनचालक सभासदांनी केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध

पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान

दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान

श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!

संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.