By : Polticalface Team ,21-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट या नादुरुस्त रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वादग्रस्त ठरलेल्या या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचलकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत येत असल्याने वाहनचालक; सभासद; ऊस उत्पादक; ग्रामस्थ आदींनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता जवळपास अडीच किलोमीटर अंतराचा अनेक वर्षापासून खड्डेमय बनला गेला होता. या रस्त्यातून मार्ग सोडताना अनेक छोटे-मोठे अपघाताला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यामध्ये जागोजागी खडी उघडी पडून रस्त्याच्या मध्यभागी अक्षरशा दीड ते दोन फूट खोल खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी वाहन चालवताना या रस्त्यातून कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून साखर कारखान्याच्या गाळप हंगामात ऊस गाळपासाठी वाहतूक करणारी छोटी मोठी वाहने अक्षरशा जीव मोठे धरूनच वाहने चालवताना दिसून आली. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूने काटेरी झाडाची कुंपणे त्यामुळे रात्री अपरात्री देखील या रस्त्यातून वाहन चालवताना मोठ्या अपघाती प्रसंगाला सर्वांनाच तोंड द्यावे लागले. या प्रश्नासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये या महत्त्वाच्या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात सडेतोड लिखाण करण्यात आले. परंतु या रस्त्याचा प्रश्न आहे तसाच राहिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे समाविष्ट करण्यात आला होता. परंतु या बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तुटपुंजा निधी उपलब्ध होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती होणे कामी अडचणीचे होत गेले. या कामे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा करून वेळोवेळी वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. पत्रकार कुरुमकर यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपाभियंता यांना आपणाकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली.
त्यानुसार संबंधित जिल्हा परिषद च्या उप अभियंता यांनी तात्काळ सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आणि काही दिवसानंतर तात्काळ हा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सामाविष्ट करण्यात आला. आता या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील तात्काळ या नादुरुस्त रस्त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन या अडीच किलोमीटर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता या रस्त्याचे कामही दोन दिवसापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रवासी वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला दोन्ही बाजूंनी मोजमाप करून सुलभपणे साईड पट्ट्या द्वारे रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे; त्याबरोबरच दोन्हीही रस्त्याच्या बाजूने जेसीबीच्या साह्याने चर काढून पावसाचे वाहणारे पाणी रस्त्यावर न येता सदर रस्त्याची लांबी रुंदी संबंधित ठेकेदाराला द्यावी; त्यानुसार रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे ही अपेक्षा ग्रामस्थ प्रवासी व वाहनचालक सभासदांनी केली आहे.
वाचक क्रमांक :