राज्यातील महायुतीचे सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार-- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

By : Polticalface Team ,22-07-2024

राज्यातील महायुतीचे सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार-- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

     लिंपणगाव( प्रतिनिधी)- राज्यातील महायुती सरकारने राज्यातील गोरगरीब दुर्लक्षित व उपेक्षित महिलांसाठी घेतलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेची राज्य सरकार प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे अशी ग्वाही  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

      सहकार महर्षी नागवडे कारखाना कार्यस्थळावर 22 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य असेल आयोजन करण्यात आले होते. 

  कार्यक्रमाचे प्रारंभी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांनी आपल्या प्रास्ताविक पर म्हणाल्या की;  श्रीगोंदेकरांवर उपमुख्यमंत्री अजित दादांचे लक्ष आहे. या तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. गाळपापर्यंत ऊस उर्जित अवस्थेत राहण्यासाठी पाट पाण्याच्या प्रश्नावर विशेष लक्ष देण्याची मागणी केली.

       तत्पूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा नव्हे तर तात्काळ अंमलबजावणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर सरकारने अधिक भर दिला आहे. या योजनेअंतर्गत तळागाळातील महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक आधार म्हणून लाडकी बहीण या योजनेचे दीड हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 ऑगस्ट-२०२४ पर्यंत रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. या योजनेची ऑगस्टमध्ये जरी अंमलबजावणी होत असली तरी त्याचे जुलै महिन्याचे देखील या योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार आहे. याबरोबरच राज्यातील अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या मानधनात देखील वाढ केल्याचे नामदार तटकरे यांनी यावेळी सांगितले. 

       यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी स्वागतपर भाषणात म्हणाले की; राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्वसामान्यांच्या हितासाठी धडाडीने निर्णय घेत आहेत. त्याची अंमलबजावणी ही तात्काळ होत आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विनामूल्य वीज पुरवठा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये पर्यंतचा टाईड पेंड आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी  पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठी तरतूद केल्याचे श्री नागवडे यांनी सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिष्टचिंतन करत श्री नागवडे यांनी जोरदार स्वागत केले. 

  यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यक्रमास उशीर झाल्याने दिलगिरी व्यक्त करत म्हणाले की; माझा वाढदिवस दरवर्षी आई व माझ्या कुटुंबासोबत साजरा होत असतो. परंतु यंदाचा वाढदिवस राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सहवासात साजरा करण्याचा निर्णय मी कुटुंबांना सांगितला असे सांगून ना पवार पुढे म्हणाले की; आपण सर्वसामान्यांचे मतांवर निवडून येतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी माझा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय मी घेतला. असे सांगून राज्यातील महायुतीच्या सरकारने राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व भाऊ या योजने संदर्भात बोलताना पवार पुढे म्हणाले की; 21 ते 65 वर्षापर्यंत महिलांना या लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे. त्यासाठी पाच लाखापर्यंत जमीन जरी नावावर असले तरी त्याचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या राज्यातील महिलांच्या हितकारक निर्णयासाठी राज्य सरकारने ४५ हजार कोटीची तरतूद चालू अर्थसंकल्पात देखील केलेली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दररोज पाच ते सात लाख फॉर्म जमा होताना दिसतात. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. महायुतीचे सरकार महिला व सर्वसामान्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेत असताना विरोधक मात्र या योजनेवर टीका करतात परंतु अजित पवार या निर्णयाचे पक्के आहेत अशी मिस्कील टिपणी देखील नामदार पवार यांनी यावेळी केली. 

    असे सांगून ना पवार पुढे म्हणाले की महायुती सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आठ लाख उत्पन्न असणाऱ्या मुलींची100% शैक्षणिक टीप भरणार आहे. तर महिलांसाठी पिंक कलर रिक्षा खरेदी करण्यासाठी 70% लोन मिळणार आहे. त्याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच विजेचा प्रश्न भेडसावतो अशा परिस्थितीत राज्य सरकारने सौर ऊर्जा बरोबरच साडेआठ हजार विद्युतपंप राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 14000 कोटीची तरतूद देखील केलेली आहे. दूध उत्पादकांना पाच लिटर मागे अनुदान देणार आहे तर कांद्याची निर्यात बंदी करायची नाही. कापूस सोयाबीन इत्यादींना अनुदानाचा प्रश्न यावेळी राज्य सरकारने हाती घेतला आहे. असे सांगून पवार पुढे म्हणाले की; राज्य सरकारने लाडकी बहीण भाऊ गोरगरीब मायमाऊलींना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी १ कोटी 15 लाख रुपयांची तरतूद देखील केल्याचे ना पवार यांनी यावेळी सांगून उपस्थित त्यांना धन्यवाद दिले.

     या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपाली चाकणकर महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे; महानंदा दूध संस्थेचे अध्यक्ष सौ वैशाली नागवडे; राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण पुणे जिल्हाध्यक्ष बिडकर इंद्रजीत जगदाळे सोमेश्वर चे चेअरमन बाळासाहेब कामठे धनसिंग पाटील भोईटे तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा या प्रमुख मान्यवरांसह    या अभिष्टचिंतन सोहळ्यास महिलांसह तालुक्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद दिसून आला.     

कार्यक्रमानंतरही ना अजित दादा पवार यांनी महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली तर उपस्थितीत महिलांच्या सभा मंडपात जाऊन हितगुज करत औक्षण स्वीकारले. 



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.