स्काऊटमुळे प्रगल्भ नागरिक घडतो – अरुण पेशकार (जिल्हा संघटक),महादजी शिंदे विद्यालयात पथक नोंदणी शिबिर संपन्न

By : Polticalface Team ,25-07-2024

स्काऊटमुळे प्रगल्भ नागरिक घडतो – अरुण पेशकार (जिल्हा संघटक),महादजी शिंदे विद्यालयात पथक नोंदणी शिबिर संपन्न

लिंपणगाव (प्रतिनिधी) - .३ वर्षाच्या बालकापासून २५ वर्षाच्या युवक-युवती करिता संस्कारक्षम वयात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत ते उद्याचे आदर्श चारित्र्य संपन्न नागरिक बनावेत यासाठी स्काऊट चळवळ जगभर कार्यरत आहे, असे गौरवोद्गार अहमदनगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् अहमदनगरचे जिल्हा संघटन आयुक्त अरुण पेशकार यांनी केले.


शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,अ.नगर व शिक्षण विभाग,पंचायत समिती,श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् अहमदनगर यांचे वतीने तालुकास्तरीय सन २०२४-२५ करिता कब-बुलबुल,स्काऊट-गाईड,रोव्हर-रेंजर पथक नोंदणी वर्गाचे आयोजन महादजी शिंदे विद्यालयात करण्यात आले होते.

पथक नोंदणी वर्गाची सुरुवात स्काऊट प्रार्थनेने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे हस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.


जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) सोनाक्षी तेलंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सांगितले की,१९०७ साली सुरु लॉर्ड बेड्न पॉवेल यांनी सुरु केलेली  स्काऊट-गाईड ही जागतिक चळवळ आज २०० पेक्षा जास्त देशांमध्ये ४ कोटीहून अधिक स्काऊट-गाईड यात कार्यरत आहे.


विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील स्काऊट पथकातील तृतीय सोपान पूर्ण केलेल्या - आर्यन वाल्मिक आवचर, शिवम मनोहर माने, आर्यन दिपक जगताप, तोहिद असलम पठाण, सिद्धार्थ शांताराम थोरात, प्रतिक कैलास जगताप, अमित संजय खेडकर, सम्राट शरद घोडके, आदित्य दिगांबर गुंजाळ, जैद आरिफ जकाते, राजहंस हृदय घोडके यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे अध्यक्ष महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक आदान प्रदान, ऐतिहासिक व मूल्याधिष्ठित प्रणालीसाठी सर्वांगीण व्यक्तिगत विकास घडविण्याकरिता शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणारी व तिच्या मुलभूत तत्त्वांवर आधारलेली एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ आहे. तसेच त्यांनी विद्यालयात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.


या पथक नोंदणीसाठी पूर्ण तालुक्यातील प्राथमिक-माध्यमिक शाळामधील स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी श्रीगोंदा पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी सीताराम भुजबळ, सहाय्यक आयुक्त गीता चौधरी,अ.नगर भारत स्काऊट गाईडचे संजय शिंदे,रमेश वारे,विकास रत्नपारखे,विद्यालयाचे पर्यवेक्षक भाऊ गदादे  उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर विकास लोखंडे  यांनी केले.आभार स्काऊट तालुका समन्वयक जावेद अत्तार यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष