एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन-बी टी शिवशरण

By : Polticalface Team ,25-07-2024

एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन-बी टी शिवशरण करमाळा प्रतिनिधी : कधी नव्हे ते महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे राजकारण गढुळ झाल्यानं सर्वसामान्य जनतेला राजकारण कोणत्या स्तराला गेले आहे याचा उबग आला आहे एकमेकांवर होत असलेले करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायम महाराष्ट्र हा सुसंस्कृत तसेच थोर संत विचारवंत साधु महात्म्य शूर वीर यांच्या पराक्रमी इतिहासाचा आदर्श तत्वज्ञान व सुपिक विचारांचा महाराष्ट्र म्हणून हृदयांत स्थान मिळवलेला महाराष्ट्र आहे परंतु हल्ली महाराष्ट्रातील सद्य स्थिती वातावरण वाटचाल पाहिली तर महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय की काय ही सर्वसामान्य जनतेला भीती वाटते आहे या पुर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काही ठराविक लोक आपलं धटींगण नेतृत्व करुन ते क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करताना ऐकलं होतं पाहिलं होत पण विद्यमान परिस्थितीत एरवी स्वतःला साधु संताचे अवतार समजणारे साधन शुचिता याचा ठेका केवळ आपल्या कडेच आहे की काय अशा आविर्भावात जगणारे वागणरे केवळ आणि केवळ सत्ता आपल्या कडेच कशी राहील किंवा मिळवता येईल या साठी सर्व विधीनिशेद वापरत आहेत सक्तवसुली संचनालय स्थानिक पोलीस स्टेशन यांचा वापर करून तसेच इतरांचे पक्ष फोडून आमदार पळवून राजकारण केले जात आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला आता उबग आला आहे जातीपातीच्या राजकारणाचे पुन्हा डोके वर काढले जात आहे आरक्षण जात धर्म एकाधिकारशाही या विषयाला खतपाणी घालून इथली सामाजिक राजकीय परिस्थिती धोक्यात आणण्यासाठी इथलं कमकुवत नेतृत्व तोंडावर बोट ठेवून डोळ्यांवर मस्ती ची झापड पांघरणयाचे सोंग घेऊन महाराष्ट्र अस्थिर करु पहात आहे सारे एकाच माळेचे मणी ओवायला नाही कुणी अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे कणखर महाराष्ट्र राकट महाराष्ट्र केवळ सक्षम व पुरोगामी नेतृत्व नसल्याने डळमळीत होऊ पहात आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष