By : Polticalface Team ,29-07-2024
घोगरगाव ( प्रतिनिधी)--श्रीगोंदा शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात आज एक अनोखा कार्यक्रम पार पडला. श्री. घन:शाम शेलार यांनी तालुक्यातील सामाजिक व राजकीय जडणघडणीमध्ये योगदान असणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी अनेक ज्येष्ठांनी आपलं मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले. अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भारवलेल्या ज्येष्ठांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेळी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजक घनःशाम आण्णा शेलार बोलताना म्हणाले, ‘मी कायमच ज्येष्ठांचा आदर करतो ज्येष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यासाठी कायमच प्रयत्न करत असतो. व त्यांच्या पासून प्रेरणा मिळाली जुन्या काळातील पदाधिकारी हे राजकारण आपण समाजाचे काही तरी देणं लागतो म्हणून करत होते.’ त्यांनी माजी सभापती कै. बापुसाहेब जामदार माजी सभापती कै. आहीलाजी दरेकर यांच्यासह अनेकांच्या कारकिर्दीतील उदाहरणे सांगितली. जुने नेते देणारे होते, घेणारी नव्हते.
कुकडी व घोड पाण्याबाबत जागरूकता असणे गरजेचे आहे वीस वर्षांपूर्वी मी सांगत होतो. घोड व कुकडीचे पाणी मिळण्यासाठी मी सदैव प्रयत्न केले. आज मंत्री वळसे पाटील हे डिंभे-माणिकडोह बोगदा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. हा बोगदा होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल नाही तर तालुक्याचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेले सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत. परंतु आज कारखान्याची परीस्थिती अतिशय दयनीय झाली आहे.
याठिकाणी ज्येष्ठांचा सत्कार केला तो फक्त तुमचा आर्शिवाद घेण्यासाठी, तुमच्यापासून मला प्रेरणा मिळण्यासाठी, तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी. अनेक जेष्ठ मार्गदर्शन करत असताना कुकडी घोड पाण्याबाबत चिंता व्यक्त करत होते व या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून लढा देण्यासाठी घनःशाम आण्णा शेलार यांना विनंती करत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती श्री. भास्करराव नलगे हे होते. प्रास्ताविक प्रा. श्री. विजय निंभोरे सरांनी केली सुत्रसंचलन श्री. संजय आनंदकर यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, प्रा. बळे सर, ऍड. झेड. टी. गायकवाड, निशांत लोखंडे तसेच तालुक्यातील अनेक जेष्ठ माजी पदाधिकाऱ्यांचे भाषणे झाली. श्री. अजीम जकाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
डिंभे-माणिकडोह बोगदा यावर आमदार बबनराव पाचपुते यांनी तसेच माजी आमदार राहुल जगताप व चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी घनःशाम आण्णा शेलार यांनी केली.