ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन . प्रा. गणेश भोसले

By : Polticalface Team ,31-07-2024

ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन . प्रा. गणेश भोसले लिंपणगाव प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात गुरुकुल प्रकल्प अंतर्गत गेस्ट लेक्चर साठी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा गावातील समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गणेश भोसले यांना आमंत्रित करण्यात आले. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना व्याख्याते म्हणाले , काही लोक त्यांच्या पैशाला वेळेपेक्षा जास्त महत्त्व देतात, तथापि, सत्य हे आहे की वेळेपेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. हीच वेळ आहे जी आपल्याला संपत्ती, समृद्धी आणि आनंद देते. जगात सर्व काही विकत घेऊ शकतो पण वेळ कोणीही विकत घेऊ शकत नाही. व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे सहज उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाबाबत समाधानी न राहता अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.पूर्वी ज्याच्याकडे जास्त शेती, ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात मोठा श्रीमंत ,जिंकायचे असेल तर संघर्ष करावाच लागतो. स्वतःला ओळखायला शिकायचे कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. यावेळी प्राचार्य हौसराव दांगडे, पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे, रामदास पवार,मीनाक्षी कदम,राजेंद्र शेळके,प्रणव नलगे,लक्ष्मी बोलणे,महादेवी माने,संतोष भोईटे , विठ्ठल लेंडे, भगवान दिघे,शंकर यदलोड , सुमती सुरसे,रोशनी भवर , स्नेहल धुमाळ , याप्रसंगी उपस्थित होते.या बहारदार कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दिघे यांनी केले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी