खुटबावच्या वैभव सौंदर्यात मोलाची भर. मा आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते. शनिवार वाडा प्रति प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न.

By : Polticalface Team ,02-08-2024

खुटबावच्या वैभव सौंदर्यात मोलाची भर. मा आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते. शनिवार वाडा प्रति प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता.०२ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे. येथील सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी रामदास गरुड यांनी आपली दिवंगत पत्नी सुशीला गरुड यांच्या स्मरणार्थ. खुटबाव गावच्या मुख्य चौकात ६ लाख रुपये खर्चुन (पुण्यातील शनिवार वाडा प्रवेशद्वाराचे प्रति कृती प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे गावच्या वैभव सौंदर्यात अधिक भर पडली असुन पंचक्रोशीतील नागरिक भाराऊन गेले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून व खुटबाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी थोरात. जी के थोरात भाऊसाहेब ढमढरे. तुकाराम शिंदे, दशरथ थोरात, शरद शेलार, महेश थोरात यांच्या पुढाकारातून गावच्या सौंदर्यात अधिक भर पडावी, यासाठी तब्बल १० लाख रुपये खर्चुन खुटबाव या ठिकाणी राशी गार्डन साकारले होते. हे आकर्षित गार्डन रोड लगत असल्याने हजारो प्रवाशी नागरीकांच्या नजरेतून चुकत नव्हते. प्रत्येक जण जवळ जाऊन समाधान व्यक्त करत होते गार्डन पाहण्याची उत्सुकता वाढताना दिसत होती. परंतु या गार्डनला प्रवेशद्वार नसल्याचे रामदास गरुड यांच्या लक्षात येताच त्यानी गावकऱ्यांशी चर्चा केली. व त्या ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याची संकल्पना मांडली प्रवेशद्वारा शिवाय गार्डन अधुरे वाटत असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले. व स्वतःच्या खर्चातून भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले. या बाबत वरील सर्व सहकाऱ्यांनी संमती दर्शवली अवघ्या पाच ते सहा महिन्यात पुण्यातील शनिवार वाडा प्रवेशद्वाराचे दुसरी प्रतिकृती खुटबाव येथे साकारण्यात आली असल्याने खुटबावच्या विकासात व वैभव सौंदर्यात अधिक भर पडली असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशद्वाराला भव्य दरवाजा बसवून त्या वरती ( आपलं खुटबाव ) असं मोठ्या अक्षरात नाव देण्यात आले आहे. पुण्यातील शनिवार वाड्या प्रमाणे. उभेऊब बांधकाम करून. दरवाज्याच्या दोन्हीं बाजूस. बुरुज साकारण्यात आले आहेत. बुरुजाच्या शेजारी सुंदर दोन हत्ती ऊभे करण्यात आले आहेत. खुटबाव येथिल प्रति शनिवार वाडा प्रवेशद्वार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे गावच्या वैभवात निश्चितच भर पडत असल्याचे मत खुटबाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गीता शितोळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी खुटबाव पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी