माजी आमदार जगताप यांनी केलेली मदत स्मरणात ठेवून कार्य करू - खासदार धैर्यशील मोहिते पाटील

By : Polticalface Team ,02-08-2024

माजी आमदार जगताप यांनी केलेली मदत स्मरणात ठेवून कार्य करू - खासदार धैर्यशील मोहिते पाटील

करमाळा प्रतिनिधी 

 -  माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात नेहमीच मदत केलेली आहे त्याचे मोहिते पाटील कुटुंबियातील तिसऱ्या पिढीला नक्कीच स्मरण असून त्याची उतराई करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली . खासदार मोहिते पाटील आज करमाळा दौऱ्यावर असताना बाजार समितीचे कार्यालयात त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे आभार मानने करिता भेट घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ चे माजी संचालक अंकुश साखरे होते .यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार  करून स्वागत केले . यावेळी बोलताना माजी आमदार जगताप यांनी जिल्ह्याच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि देशभक्त नामदेवराव जगताप  यांच्यात  तात्विक मतभेद जरी असले तरी जिल्हयाच्या विकासात्मक कामां करिता ते वेळोवेळी एकत्र येत असल्याचे आवर्जून नमूद करीत १९६२ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे उदाहरण दिले. तसेच  २०१४ साली लोकसभा निवडणुकीत विजयदादा व २०२४  साली धैर्यशील भैय्या यांना करमाळा तालुक्यातील जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे याचे नूतन खासदार यांना आठवण करून देत त्यांनी विकास कामांमध्ये करमाळा तालुक्याला झुकते माप देणे बाबत आवाहन केले . यावेळी माजी आमदार जगताप यांनी नारायण आबा पाटील यांच्याकडे पाहत करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यावेळी दोन सुवासिनी एकत्र येतात त्यावेळी निश्चितच निकाल चांगला लागतो  असे म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व एकच हशा पिकला . यावेळी मा .आ . जगताप यांनी गत लोकसभा निवडणुकी वेळी मोहिते -पाटील, जगताप व नारायण आबा पाटील यांनी एकत्रितपणे निबांळकर यांना विजयी करण्याचे काम केले होते . त्यानंतर  धैर्यशिल मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी पवार गटाची उमेदवारी घेवून निवडणूक लढवीली तरी देखील आम्ही तूमची साथ सोडली नाही . तुमच्या विजयासाठी व मताधिक्या साठी कसोशिने प्रयत्न केले . असा उल्लेख करित बदलत्या राजकिय भूमिका पार पाडताना तुम्ही सर्व प्रसंगाने एकत्रित येता पण कारवाई मात्र आमच्यावरच होते व मी एकटाच राहतो पण समोर उपस्थित असलेली निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी माझ्या सोबत कायमच राहते त्यामुळे मी राजकारणात घट्ट पाय रोवून उभा आहे असे म्हणताच मोहीते पाटील यांनी जगताप यांच्या व त्यांच्या भावी पिढीच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दी विषयी भाष्य करताना  याबाबत विजयसिंह मोहिते पाटील व वरिष्ठ नेते योग्यनिर्णय घेतील व तसा निर्णय घेण्यास आम्ही आग्रहाने त्यांना भाग पाडू असे अभिवचन उपस्थित जनतेसमोर दिले. या प्रसंगी करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी मनोहर गुंडगिरे , दादासाहेब कोकरे , वैजिनाथ कदम व संभाजी रिटे यांची निवड झाल्याबद्दल खा मोहीते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , नगरसेवक अतुल फंड , श्रेणिक खाटेर , नजीर अहमद  शेख , बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर , संचालक महादेव कामटे , नागनाथ लकडे , आण्णासाहेब पवार ,शिवाजी राखुंडे , जनार्दन नलवडे , रामदास गुंडगिरे ,सागर दोंड,मनोज पितळे, परेश दोशी ,माजी संचालक दादासाहेब जाधव , औदूंबर मोरे , मयूर दोशी, देवानंद बागल , खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव डुबल , दादासाहेब लबडे , शहाजी शिंगटे , हनुमंत ढेरे , आदिनाथ चे प्रशासकिय संचालक ॲड दिपक देशमूख , अजित तळेकर , बापू रिटे, डॉ .अमोल घाडगे , विक्रांत मंडलेचा , राजेंद्र चिवटे , अमर साळुंखे , जोतीराम ढाणे , दिलीप दोंड ,आनंद शिंदे , शहाजी धुमाळ ,बंटी जाधव , पांडूरंग बोराडे , संतोष शिंदे , वंदन नलवडे , दादासाहेब वारे , संतोष ढेरे, कासम पठाण ,यांचे सह जगताप गटाचे प्रमूख पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक दत्तात्रय भागडे यांनी तर आभार यूसूफ शेख यांनी मानले . *सध्या करमाळा तालुक्याचे राजकारणात आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्रित असून २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत संजय मामांना विजयी करण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा होता . आजच्या कार्यक्रमात मोहिते पाटील व जगताप यांच्या बरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती ठळकपणे लक्ष वेधून घेत होती . यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील हालचालींना प्रचंड वेग आल्याचे मात्र प्रकर्षाने जाणवू लागले आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी