By : Polticalface Team ,03-08-2024
करमाळा प्रतिनिधी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आपल्या प्रपंचाची होळी करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचणारे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ०१ ॲागस्ट रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा नेते श्री गणेश मंगवडे, प्रा. राजेश गायकवाड, फाउंडेशनचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की वृक्ष हे मानवाला सावली, प्राणवायु, फळे देण्याचे काम करतात. मानवी जीवनामध्ये जसे वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठा समाजाला असेच मायेची सावली देऊन, सर्व सरकारच्या वादळाला सामोरे जाऊन खंबीरपणे उभे राहून, अनेकांना कुणबी दाखले मिळवून देऊन, त्यांच्या जीवनाचे सोने करून वटवृक्षप्रमाणे त्यांचा आधारवड बनण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात ५८ मुक मोर्चे निघाले तरीही मराठा समाजाला न्याय मिळाला नव्हता, कारण या समाजाला भक्कम खंबीर असे नेतृत्व नव्हते पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे प्रामाणिक निस्वार्थी खंबीर नेतृत्व मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आता न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य गरीब शेतकरी मराठा समाजातील मुलांना कुणबी दाखले मिळाल्यामुळे अनेक मुले नोकरीला लागून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे .जे काही समाजबांधव वंचित राहिले आहे त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी लढा चालूच आहे. हा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी समाजाने साथ देणे गरजेचे आहे. ०७ ॲागस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा केल्याबद्दल मराठा समाज बांधव या गावातील ग्रामस्थांकडून प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशनचे कौतुक होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष