भिलारवाडी येथील पैलवान दर्शन अंबोधरे यांनी 70 किलो वजन गटात ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत मिळविला करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक
By : Polticalface Team ,03-08-2024
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील भिलारवाडी विद्यालय भिलारवाडी प्रशालेचा विध्यार्थी दर्शन अण्णा आंबोधारे याची 71 किलो वजन गटात ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असून त्याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिपक आबा साळुंखे पाटील, सचिव मा.श्री.लऊळकर सर ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.उबाळे सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री.फडतरे सर यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे
सोलापूर जिल्ह्यातील विशेषता करमाळा तालुक्यामधून ग्रामीण भागात मधून भिलारवाडी येथील एका सर्वसामान्य शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याचे सर्वत्र तोंड भरून कौतुक होत आहे
वाचक क्रमांक :