युवती व महिलांसाठी 11 ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन - नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,04-08-2024

युवती व महिलांसाठी 11 ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन -   नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा व सौ अनुराधा राजेंद्र नागवडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रविवारी दि. 11 ऑगस्ट रोजी युवती व महिलांसाठी भव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की; बेंगलोर येथील ग्लोबल इलेक्ट्रॉनिक पार्ट लिमिटेड या कंपनीला रोजगार मेळाव्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन रोजगार मेळाव्यासाठी मान्यता दर्शवली आहे. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; या कंपनीमध्ये मुलाखतीनंतर जे  विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना कंपनीकडून सर्व सुख सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रति दरमहा पंधरा हजार दोनशे रुपये व पुढे जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार रुपये या कंपनीत रोजगार उपलब्ध होणार आहे. सदर रोजगार मेळाव्या प्रसंगी कंपनीचे अधिकारी महाविद्यालयात मुलाखती घेण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य मुलाखतीद्वारे मुलींना कंपनीमध्ये जॉईन करून घेणार आहेत. याबाबत मुलाखतीसाठी आपल्या योग्य शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीला  युवती व महिलांनी उपस्थित राहावे. अधिक माहिती देताना श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या महाविद्यालयाची मोठ्या जिद्दीने व संघर्षातून उभारणी करून आज हे महाविद्यालय सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या महाविद्यालयाला देश व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

       श्री नागवडे यांनी पुढे आणखी म्हणाले की; या महाविद्यालयाने महाविद्यालयीन युवा युवतींना गुणवत्तापूर्ण  शिक्षण देत असताना शिक्षणानंतरही विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या अनुषंगाने श्री  छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने आतापर्यंत करियर कट्टाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही  युवतींसाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळव्यासाठी जास्तीत जास्त युवती व महिलांनी रोजगार मेळाव्याचे सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश चंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी